अध्याय दूसरा -भाग एक
गुरु कशाला हवा?? (हेमाडपंतांचे बाळासाहेब भाटयांशी झालेल्या वादातुन मिळालेले उत्तर )
शिर्डीमध्ये हेमाडपंत आणि बाळासाहेब भाटे ह्यांच्या मध्ये गुरु कशाला हवा? ह्या विषयावार वाद झाला त्या वादातुनच मिळालेल सुंदर उत्तर..
आपण आपल्या विचारांच्या, राग, क्रोध, मत्सर, मोह ह्या सर्वांच्या जाळयात अडकलेले असतो. ह्या भावना किंवा अहंकार, गर्व, माज ह्या सर्वानमध्ये आपण गुंतलेलो असतो म्हणजे आपण ह्याच्या दबावाखाली असतो. पारतंत्र म्हणजे नक्की काय तर एखाद्याच्या दबावाखाली राहने. तो सांगतो तेच एेकणे, करने. गुरु आपल्याला ह्या सर्वातुन दूर करतो. कधी अध्यात्माच्या वाटेवर तर कधी विज्ञानाच्या वाटेवरुन तो त्याच्या बाळाला भक्कम बनवत असतो. मानवी मनावर ताबा करण्यासाठी त्याच्या मनात भीति उत्तपन करने गरजेचे असते अशी भीति दूर करण्याच काम गुरु करतो.
बाळाला योग्य तो मार्ग दाखवन्याच काम फक्त गुरुच करू शकतो.ज्याचे कार्य आहे ते त्यानेच करायला हवे. जर आपण आयत्या गोष्टीची वाट पाहत राहीलो तर काहीच होणार नाही. हे सर्व कार्य योग्य वेळी, योग्य त्या ठिकाणी योग्य त्याच व्यक्तिशी करुन घ्यायचे काम गुरु करतो. आपले काम आपल्याला माहित असते पण त्याचा मार्ग गवसत नसतो. हा मार्ग दाखवन्याचे काम गुरु करतो.
प्रारब्धाशी लढन्यासाठी त्यातून बाहेर काढ़न्यासाठी गुरु खुप महत्वपूर्ण आहे.भुतकाळातल्या गोष्टीना मागे टाकून भविष्यकाळ सुधरवन्याचे काम गुरु करतो.नकारात्मकतेकडून सकारात्मकते कड़े नेणारा सद्गुरु असतो. गुरु का हवा ह्याची अनेक कारणे आहेत त्याची यादी करने कठिन आहे.
गुरु कशाला हवा? ह्या प्रश्नाच उत्तर आपण गुरुच्या सानिध्यात आल्याशिवाय कळणार नाही. गुरुचे प्रेम त्याची माया बाळाविषयी त्याच्या मनात असणारा कळवळा ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी त्याच्या सहवासाची तितकीच गरज असते. त्याच्या प्रेमाला अनुभवण्याची संधी हातून सुटता कामा नये. मनाला शांतता देणारे त्याचे कारुण्याने भरलेले नयन त्याच्या गोड़ आठवणी अनुभव सदा मनात साठवुन ठेवल्या पाहिजेत .
बाळासाहेब भाटेंसोबतचा वाद सुटता सूटत न्हवता. हे जानून हेमाडपंत मशिदित गेले. तेथे बाबानी त्यांना पाहून काकासाहेबांना विचारतात
"काय चालले होते वाड्यात |वाद कशाचा होता भांडत|काय म्हणाले हे हेमाडपंत |" अशा शब्दात विचारपूस केली..... ह्या बाबांच्या शब्दावरून गुरु कशाला हवा हा हेमाडपंताच्या मनाचा वाद सुटला.
ह्या पुढचा सर्व अभ्यास आपण पुढच्या भागात करू या.

Comments
Post a Comment