पी -पी पियु, पी -पी पियु असा खणखणीत आवाज काढणारा चातक पक्षी जसे पावसाच्या एका थेंबाची वाट पाहतो. शेतकरी त्याच्या शेतातील धन -धान्याची वाट पाहतो. खेळाडू टूर्नामेंटची कलाकार त्याच्या कलेला कसा वाव मिळेल ह्याची वाट पाहतो. माणूस सुखाची वाट पाहतो. भोळे भाविक गणरायाची नवरात्रिची वाट पाहतात. तसेच बापू आम्ही तुझी वाट पाहतो. ही वाट पाहता पाहता न कळत मुखातून येते... एकवेळ तू सहजचि ये रे, अनिरुद्ध मम घरी | आगमनाची वाट पाहतो, दे मज तुचि सबूरी || हे सद्गुरुराया तुम्ही माझ्या घरी कधी येणार. तुमच्या आगमनाची मी आतुरतेने वाट पाहतेय. शबरीने जशी श्रीरामाची वाट पाहिली होती तशीच मी तुझी वाट पाहतेय. दारासमोर रांगोळ्याची रास घातली आहे. फुलांच्या माळा तयार आहेत. गोडीचे आप्पे तयार आहेत. तुम्हाला आवडते ते केसर पाणी पण तयार आहे. जेवनाचाही घाट घातला आहे. आता फक्त तुम्ही या. माते शबरी सारखी आणि बंधु भरतसारखी सबूरी आमच्यात उरली नाही. तुमच्या श्रीचरणांचे दर्शन घ्यायला मन आतुर झालाय.तुमची सेवा करायला उर ...