अध्याय चौथा
हा अध्याय म्हणजे साक्षात साईंचे विठ्ठल रुपात दर्शन घेणे. ह्या अध्यायामध्ये 3 गोष्टी आल्या आहेत
चला मग गोष्टींसोबत बाबांचे प्रेम अनुभवूया.
साईंबाबा माहिती अध्याय चौथा
16 वर्षांचे असताना साईं निंबातळी शिर्डी गावात प्रथम प्रकटले. त्यांचे आई वडील कोण ❓️ते कुठे राहतात ❓️त्यांचा जन्म कुठे झाला ❓️हे कोणालाच माहित नाही. स्वतच सर्व सोडून बाबा शिर्डीत आले.
नाना चौपदारांच्या आईने कथा सांगितले. कोवळ्या वयात ह्याने जप तप केले. लहान वयात हा एकटा रहायचा ह्याला दिवसा कोणाची संगती न्हवती रात्री कोणाची सोबत न्हवती. मनात कसलीच भीति न्हवती. कधी कोणाच्या दारी गेले नाही. सतत लिंबाच्या झाड़ाशेजारी बसलेले असायचे. त्या बाळकांविषयी सर्वांनाच जाणून घ्यायची फार इच्छा होती. पण बाबांबद्दल कोणाला काहीच कळत न्हवत. एक दिवस दोन -चार जणांच्या अंगात खण्डोबाचे वारे आले. लोकानी त्यांना प्रश्न विचारण्यास सुरवात केली. काहिनी त्या 16 वर्षाच्या त्या मुलाबदल प्रश्न विचारण्यास सुरवात केली. तेव्हा अंगात आलेल्या त्या चौघांपैकी एकाने सांगितले, मी दाखवतो त्या जगी खना तेथेच तुम्हाला ह्या मुलाबदल माहिती मिळेल. गावकऱ्यांनी लगेच त्या जागी खनले तिथे त्यांना विटा आढळल्या. 127विटांचा थर पूर्ण होताच. जात्याची तळी सापडली तेथे एक भुयार होते. त्या भूयारात चार ज्वलित दिवे होते. अंगात आलेल्या त्या मुलाने सांगितले की हां पोर इथे 12 वर्ष तप करीत होता. हे ऐकुन गावातील सर्वानी बाबाना प्रश्न विचारण्यास सुरवात केली.
"म्हणे हे माझ्या गुरुचे स्थान |अति पवित्र हे माझे वतन |
आहे तैसेंचि हे करा जतन |माना मदवचन एवढे || 131|| "
ओवी क्रमांक 131 अध्याय चौथा 1+3+1+4=9 नाथसंविध. बाबा म्हणतात, " हे माझ्या गुरुचे स्थान आहे. ते इथे बसायचे हे स्थान खुप पवित्र आहे ह्याचे जतन करा. हे माझे वचन आहे. बाबांच्या आज्ञेवरुण त्या जागेला पूर्वीप्रमाणे बंद करुन ठेवले. म्हाळसापति आणि इतर जूने शिर्डीवासी बाबांच्या गुरुचे स्थान म्हणून त्याला वंदन करत असे. बाबा त्या ठिकाणी मौन करत असे. नंतर साठे साहेबांनी समाधी आणि निबाच्या झाडाशेजारचि जागा विकत घेतली. त्या जगी ईमारत बांधली ती इमारत यात्रे करुणसाठी रिक्त ठेवली. निंबास पार घातला. उत्तरेला जीना तयार केला त्या जिन्याखाली दक्षिण दिशेला एका कोण्यावर भक्त गुरवारी आणि शुक्रवारी धुप जाळायचे. जो कोण्ही असे करेल त्याला श्रीहरी सुख देईल अस साइनी वचन दिलय.
साईंनचा प्रत्येक शब्द प्रमाण मानला जातो. ज्याने ह्याचे अनुकरण केले अवलंबन केले तो भवसागरातून पार झालाच म्हणजे समजा.
समर्थ साईंचे जे दर्शन | तेणेंचि आम्हा योगसाधन |
करीता तयांसी संभाषण |होय शालन पापांचे ||62||
योग केला तर शरीराचा आणि मनाचा विकास होतो. मन शांत होत शरीर सुदृढ़ होते. त्या माऊलीच्या दर्शनाने योग करण्याइतके फायदे होतात. त्यांच्याशी आपण जर आपले प्रॉब्लेम शेयर केले तर ती संकट मुळासकट निघून जातात. त्यांच्याशी संभाषण केल्याने आपले पाप निघून जातात. आपण केलेल्या चूका त्याच्या चरणांशी अर्पण केल्यावर ते प्रारब्ध पूर्णतः नष्ट होते.
साईंनी दासगणूला नामसप्ताह करण्याबदल आज्ञा केली या नामसप्ताहात "विठ्ठल प्रकटला" पाहिजे.दासगणूने साईंची आज्ञाचे पालन केले. विठ्ठल प्रकटला पाहिजे म्हणजे काय तर नामस्मरणात इतकी ताकद आहे की तो परमेश्वर साक्षात् प्रकटतो. इथे अजुन ऐक गोष्ट लक्षात येते बाबांनी दासगणूला का सांगीतले नामसप्ताह बदल. दासगणू =दास +गणु. जो देवाचा दास आहे त्याला देवाला कशी आळवणी घालायची हे बरोबर माहित आहे. म्हणजेच काय तर त्या देवाचे दासत्व घ्यावे. दासगणूचा भोळा भाव, त्यांचे नामस्मरणात दंग होने ह्या सर्वामुळे त्यांची हाक देवापर्यंत लवकर पोहचते. बाबा पुढे बोलतात,
बाबा तव छातीस हात लाविती |दासगणूसी निषुनि वदति |
"हो हो प्रकटेल विठ्ठलमूर्ति" |भक्त भावार्थी पाहिजे ||84 ||
छातीस हात लावणे म्हणजे हृदयातून त्या परमेश्वराला हाक मारने. ओवी क्रमांक 84=8+4=12=1+2=3म्हणजे काय तर तो त्रिविक्रम. विठ्ठल नक्कीच प्रकटेल जेव्हा हृदयाच्या कोपऱ्यातून आपण त्याला साद घालु आणि ती साद कशी तर भावपूर्ण, भक्तीपूर्ण.
काकासाहेब दीक्षित कथा :-काकासाहेब दीक्षित ध्यानस्थ असताना विठ्ठलाचे दर्शन झाले. नंतर ते बाबांच्या दर्शनाला जात होते. तितक्यात बाबा त्यांना विचारतात, "विठ्ठल पाटिल आला होता ना? भेट झाली ना? तो मोठा पळपुटा आहे जर दुर्लक्ष झाला तर तो पळून जाईल ".हा सर्व संवाद सकाळी झाला. दुपारच्या दरम्यान पंढरपुरच्या विठठलाच्या पाच -पंचवीस तस्बीरी घेऊन एक व्यक्ति त्या विकायच्या इच्छेने आला होता. दीक्षितांचे त्याच्याकडे लक्ष गेले. त्या व्यक्तीच्या हातातील छबि त्यांच्या स्वप्नातील मुर्तीसारखी होती. तो फोटो पाहताच त्यांना बाबांचे शब्द आठवले. त्यांनी लगेचच तो फोटो विकत घेतला.
निरूपम :बाबा वेळोवेळी आपल्या बाळाला संकेत देऊन त्यांना सावध करत असतात ते प्रत्येक वेळी आपल्या सोबत असतात. खरा तर जेव्हा काकसाहेबांना ध्यानस्त असताना दर्शन झाले ते दर्शन ही त्यांना बाबांनीच दिले होते. इथे आपल्याला दीक्षितांचा भोळा भाव अनुभवायला मिळतो. दीक्षिताना माहित होत ध्यानस्थ असताना विठ्ठल रुपात बाबांनीच दर्शन दिल आहे पण तरी देखील ते बाबांना हा स्वपन दृष्टांत सांगायला जात होते. बाबांनी त्यांना स्वतःच सर्व सांगितले आणि दीक्षिताना निक्षुण सांगितले की विठ्ठल पळपुटा आहे त्याला पकडून ठेवा. कथेतून सांगायचे तात्पर्य हे की आपला सद्गुरु आपल्याला वेळोवेळी सावध करत असतो. आपल्या पाठीशी तो नेहमीच असतो. इतकच काय हा सावळ्या पांडुरंग आपल्या घरातही येतो आपल्याशी भेट करतो पण आपल्या नकळत. आपल्याला त्याचे सगुन रूप कळायच्या आधीच तो तेथून निसटतो. अश्या पळपुट्या विठ्ठलाची आणि आपल्या बाळाची भेट घडून आणण्याचे काम फक्त सद्गुरु करू शकतो.
अध्यायात पुढे भगवंत क्षीरसागर ह्यांची कथा येते. भगवंत क्षीरसागर यांचे वडील विठ्ठल भक्त होते. ते वारंवार पंढरपुरची फेरी करायचे. क्षीरसागरांच्या घरी विठ्ठल मूर्ति होती ते रोज नैवेद्य दाखवायचे. भगवंत क्षीरसागर ह्यांच्या वडिलांच्या मृत्युनंतर त्यानी कधीही पांडुरंगाला भोग दाखवला नाही. एकदा भगवंत क्षीरसागर शिर्डीला गेले. त्यांना बघून बाबा वदले..
बाबा आठवूनि तयाचा पिता |म्हणती " तो होता दोस्त माझा ||99||"
हा त्या माझ्या स्नेहाचा सूत |म्हणुनी यासी मी आणिला खेंचित |नाही कधी हा नैवेद्य करीत |उपाशी ठेवीत मजलाही ||100 ||
ह्याचा पिता हा माझा मित्र होता. आपण त्या परमपित्याला एकदा जरी प्रेमाने हाक मारली तरी ही तो आपल्यासाठी धावत येतो.तो आपला पिता होतो. आपण त्याच्यासाठी नाही तर तो आपल्यासाठी आपल मित्रत्व स्वीकारतो. इथे पीपा दादांच्या भजनाची ओळ आठवते..
चल चल तू संग उसके
वो पिता हमारा है ||
आपण त्याला स्वीकरणारे कोण आहोत? तो आपल्याला स्वीकारतो आपल्या चुकांसोबत पापांसोबत षडरिपु सोबत आपल्या काम क्रोध वासना ह्या सर्वांसोबत तो आपल्याला जवळ घेतो कारण त्याच प्रेमच बेभान आहे. तो फक्त आपल्यालाच तारतो का? नाही तो आपल्यासोबत असणाऱ्या प्रत्येकाला न्याहाळतो. अगदी प्रेमाने ओलचिंब करतो म्हणून तर साइनी भगवंत क्षीरसागर याना शिर्डीला खेचून घेतले. त्यांना त्यांची चूक दाखवली ते बाबांना कशा प्रकारे उपाशी ठेवायचे हे बाबांनी त्यांना देखाउन दिले. इथे अजुन एक गोष्ट नोटिस करतो ते म्हणजे आपण प्रेमाने भरवलेला एक घास ही त्याला पुरेसा असतो. त्याचे आपल्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष असते. जेव्हा आपण त्याला नैवैद्य अर्पण करतो तेव्हा खुप प्रेमाने तो ही त्याचा स्वीकार करतोच. म्हणून तर शबरीने दिलेली उष्टि बोरे लक्ष्मणाने नाकारली पण प्रभु श्रीरामानी ती ग्रहण केली. त्याला काय आवडते.. त्याला फक्त भोळा भाव आवडतो. बाबांनी क्षीरसागर ह्याना स्वत: शिर्डी ला नेले आणि त्यांना पूजन करायला लावले.
बाबानची लीला बाबांनाच माहित. एकदा दासगणूला प्रयागतीर्थी स्नान करायची इच्छा उत्पन्न झाली. ते बाबांकडे आज्ञा मागण्यासाठी गेले होते.
"आले आज्ञापन घ्यावया"||102|| म्हणजे काय आपल्याला प्रत्येक एक गोष्ट करताना त्याची अनुमति घेणे गरजेचे आहे. त्याच्या आज्ञेशिवाय आपण कोणतीच गोष्ट करू नये. ओवी क्रमांक 120 =1+2+0=3 त्रिविक्रम. म्हणजे त्या त्रिविक्रमाची अनुमति असल्याशिवाय आपण कोणत्याही कामात पुढे पाउल टाकुच नये.
अध्याय 4 ओवी क्रमांक 120=4+1+2+0=7 त्याची साथ असल्याशिवाय आपण भवसागरातून पार होने अवघडच. बाबा दासगानुला म्हणतात, " नलगे तदर्थ जाने दूर |हेचि आपले प्रयागतीर| विश्वास धर दृढ़ मनी ||103||
कुठेही दूर जायची गरज नाही. तुझे प्रयागतिर इथेच आहे मनात विश्वास धर तुला इथेच सर्व मिळेल. ओवी क्रमांक 103 अध्याय 4. 1+0+3+4=8 अष्टभाव जेव्हा आपण त्याच्या चरणांशी अर्पण करतो तेव्हा आपल्याला त्याच्या दारीच स्वर्ग मिळते. दासगणूच्या बाबतीत पण हेच झाले दासगणूने बाबानच्या चरनांवर माथा ठेवला आणि....
बाबांचे चरणी ठेविता मस्तक |उभयंगुष्ठी निथळले उदक | गंगायमुनोदक पाझरले ||104||....बाबांच्या अंगठ्यातून उदक म्हणजे जल वाहु लागले. आणि ते जल म्हणजे साधे जल न्हवते तर गंगायमुनोदक म्हणजे गंगा +यमुना +उदक. गंगा यमुनेचे जल होते.
ज्या प्रयागस्नानासाठी दासगणू दूर जाणार होते तेच प्रयागस्नान दासगनुसाठी बाबांनी शिर्डीत आणले होते. आपला सद्गुरु आपल्यासाठी अशक्य ती गोष्टही शक्य करतो." माँगा था एक उसने दिया लाखों मे एक " ओवी क्रमांक 104 अध्याय चौथा. 1+0+4+4=9 नाथसंविध. त्याच्या चरणांशी सर्व नाथसंविधच आहे. जी पापे धुण्यासाठी लोक गंगा -यमुना मधे अंघोळ करण्यासाठी जातात ती गंगा संतांच्या पायाशी असते लोकांचे पाप धुण्याकरता.जर अशा संतांचे चरण आपण सोडले त्यांचा ध्यास आपण सोडला तर आपल्याला गंगा यमुनेचे स्नान मिळणेहि अवघडच. आणि जरिहि आपल्याला स्नान मिळाले तरी ती पापे धुतली जातीलच असे नाही.
नंतर दीक्षितांचा वाडा झाला नंतर श्रद्धावानच्या सोईसाठी दगडी वाडा ही झाला. "दीक्षित हे पांगळे होते. "चांदोलकरानी त्यांना साईंचा महिमा सांगितला त्यांना सांगितले की जर तुम्ही साईना भेटलात तर तुमचा पंगुळपना जाईल.
" चाँदोरकरांची गांठ पडली |साईंची कीर्ति कर्णी आली |
म्हणती पहा दर्शन -नव्हाळी |जाईल पांगुळपना तात्काळ ||154|| ओवी क्रमांक 154=1+5+4=10=1+0=1 म्हणजेच तो एकमेव. साईंची कीर्ति केली म्हणजे गुणसंकीर्तन केले. चाँदोरकराना पाठवणारे साईच होते. त्याच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही. चाँदोरकर म्हणतात दर्शन घे म्हणजे पांगुलिकता निघून जाईल म्हणजे साईबद्दलचा विश्वास.
दर्शन नव्हाळी म्हणजे त्या साईंचे रूप एखाद्या नववरधू सारखे निखळले आहे.जसे एखाद्या नववरधूला आपण सतत पाहतो तसच त्या साईला तुम्ही पहा. तुमचा पांगुळपना लगेच जाईल. शारीरिक व मानसिक पंगुळपना लगेचच जाइल. पुढील ओवित दीक्षित म्हणतात पायांचा लंगड़ेपना मला जाणवत नाही पण माझ्या मनाचा लंगड़ेपना म्हणजे माझ्या मनातील वाईट विचार, वासना, कुबुद्धि , कुसंगति, संशय ह्या आणि अशा कितीतरी घाणेरड्या गोष्टि माझ्यापासून दूर कर.
नानासाहेब चाँदोरकर ज्यानी हेमाडपंतांना शिर्डी गावाचा महिमा सांगितला त्याच चाँदोरकरानी दीक्षितानाही पांगुळपना घालवण्यासाठी त्यांना शिर्डीतील साईचा महिमा सांगितला. म्हणजे आपल्याला आलेला अनुभव आपण सर्वाना सांगावे व त्याचे दुख कमी करण्याचा प्रयत्न त्या राजाच्या साथीने करावा.
हे शरीर म्हणजे फक्त हाडामासाचा गोळा आहे. हा संसार फक्त चार दिवसांचा आहे. पण हे मन अखंड आहे. त्यामुळे ह्या मनाला तू तुझ्या ताब्यात घे. ह्या चार दिवसांच्या संसाराला तू तुझ्या प्रेमाने जोड़. "माझा पाय लंगड़ा राहिला तरी चालेल पण माझे मन लंगड़ /अपंग राहता कामा नये. "
दीक्षिताना 1909 मधे साईंचे दर्शन भेटले नंतर थोड्या दिवसांनी त्यांनी शिर्डितच राहणे पसंत केले. त्यासाठी त्यांनी साईंची आज्ञा घेऊन वाडा बांधला. रामनवमीच्या दिवशी गृहप्रवेश केला. नंतर श्रीमंत बुट्टीचा वाडा झाला. तेथेच बाबा राहायचे. बघता बघता शिर्डीत 3 वाडे झाले. साठयांच्या वाड्यात बाबांनी स्वतः फूलझाडांची लागवन केली. बाबांनी तयार केलेल्या ह्या बागेचि कथा आपण पुढील अध्यायात अभ्यासु.
ॐ साईं. अंबज्ञ. नाथसंविध
भक्ती पालांडे
Comments
Post a Comment