कानी आले शब्द माझ्या सद्गुरुरायाचे | अन धाव घेई मन झाले वेडेपिसे ||धृ ||

कानी आले शब्द माझ्या सद्गुरुरायाचे |
अन धाव घेई मन झाले वेडेपिसे ||धृ ||
 चिव चिव असा चिऊताईचा आवाज जेव्हा सकाळी सकाळी कानावर पडतो तेव्हा अस वाटत माझा त्रिविक्रम बाप्पा मला उठवण्यासाठी आलाय. त्या चिऊताईच्या आवाजातुन बापुराया तुझ पितृवचन आठवते. Dad तुमचा आवाज कानी पडताच हरिगुरुग्रामची आठवण येते. डोळ्यातून पाण्याची धार लागते. बापू "सत्याला मरण नाही "असच विचार करुन तुझी बाळ त्याच वाटेवर जातात पण बाबा तरीही ठोकर लागते. बाबा कितीही कुणाशीही चांगले वागले तरीही ठेच लागून ढोपरं फुटतातच. रक्त येत जखमा होतात. बाबा जखमा शरीरावर होतात पण घाव मात्र मनावर उमटतात आणि त्यावेळी बाबा तुझा शब्दन शब्द आठवतो ते सर्व आठवून मन तुझ्याकडे धाव घेत. तुझ्या शब्दांसाठी मन वेडेपिसे होते. तुला पाहण्यासाठी डोळे भरून येतात. कोरन्टाइनच्या शेवटच्या चार महिन्यात मनाची अवस्था तुझ्या आठवणीने हळवी झाली आहे. Dad डिजिटल उपासनेतून तुझे शब्द जेव्हा कानावर येतात तेव्हा अस वाटत धावत -पळत तुझ्या समोर यावे आणि तुझ्या काठीची जागा घ्यावी जेणेकरून तुझा हाथ माझ्या डोक्यावरच राहील. जिथे तू तेथे मी. नजरेसमोरून दूरच नाही होऊं देणार. अर्जुनासाठी जसा कृष्णाचा प्रत्येक एक शब्द प्रमाण होता. साईंचे प्रत्येक एक वाक्य त्यांच्या बाळासाठी काळ्या दगडावरची रेघ आहे. 
              माउली तुमच्या शब्दांमध्ये अमृतसारखी ताकद आहे. तुळशीसारखी पवित्रता आहे. कानात ते गुंजत राहतात मनात ते घोळत राहतात. त्यामुळे चेहऱ्यावर एक वेगळीच प्रसन्नता येते. गेल्या काही महिन्यात तुझ्या आवाजाइतकीच तुला भेटण्याचीही आतुरता वाढत चालली आहे. हा क्वारंटाइन लवकरच संपेल आणि आपण लवकरच ह्या एकाच आशेवर आम्ही आहोत. "आंनद माझा आहे कारण हा सच्चिदानंद माझा आहे "ह्या मूलमंत्राने मनात घर केलय. Dad जेव्हा आम्हाला कोण्ही वेडा म्हणतो ना तेव्हा थोड़ वाईट वाटत पण जेव्हा सर्व बोलतात "तू बापू वेडा आहेस "तेव्हा आकाशातले तारेदेखील माझ्या हातात आल्यासारखे वाटतात आणि लगेच मनात येत... आज मे ऊपर आसमा निचे, आज मे आगे, जमाना हे पीछे... 
            बाबा तुझ्या वाणीने आम्हाला इतक वेड लागलय की बाकी कोण आम्हाला काय बोलतय, आमच्या बद्दल काय विचार करतोय ह्याने आम्हाला काहीच फरक पडत नाही. राया तुझ्या नावात मला वेडेपिसे व्हायला फार आवडते. आणि मी जरी नाही म्हटल तरी हे माझे बावरे मन काही एेकत नाही. सतत तुझ्याच मागे पळत सुटत आणि मग मनात येत... 
   तुझ्या मागे अधीन या मनाला कसे मी सावरू 
   अनिरुद्धा, तूच माझा सद्गुरु...
हरी ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध 
भक्ती पालांडे 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अध्याय दुसऱा सारांश