अध्याय तिसरा -भाग एक नामस्मरणाचे महत्व
नामस्मरणाचे महत्व
नाम संकीर्तन साध पै सोपे | जळतील पापे जन्मांतरीचि ||1||
तुकाराम महाराज ह्या अभंगात नामस्मरणाचे महत्व सांगतात. नामस्मरण हे सर्वात सोपे साधन आहे जन्मांतरीचि पापे धुवायला. नामस्मरणाने पापे फक्त धुउन नाही तर जळून जातात म्हणजेच काय तर समूळ नष्ट होतात.
नाम नारायण अंती उद्धारक |नामा म्हणे देख भाक माझी ||
संत नामदेवाच्या अभंगात त्यांनी नामाचे महत्व विशद केले आहे. भगवंताच्या नामानेच उद्धार होणार आहे. त्याचा फक्त अंश देखील माझा उद्धार करणार आहे. संतांनी नामस्मरणाचे महत्व वेळोवेळी मांडलेच आहे.
नामस्मरण हे असे बीज आहे जे उजाड जमिनीवरही ओलावा आणून त्यात बी सहज़ पेरले जाईल. त्या" बी " ला अंकुर फुटुन त्याचा सतत फुलनारे रोपटे येते. ह्या रोपट्याला खत पाणी मिळत ते सेवा आणि भक्तीच. नामस्मरणाचे बी पेरणारे आपण असतो पण त्याला सेवा आणि भक्तीचे खत पाणी देण्याचे काम त्याची उन-पाऊस, वादळ -वारा, पुर -दुष्काळ ह्या सर्वांपासून योग्य काळजी घेण्याचे काम सद्गुरु करतो.आपण एक पाऊल टाकल की तो उरलेली 107 पाउल आपल्यासाठी टाकतोच.
सत्ययुगात ध्यान करुन भगवंताला प्रसन्न केले जात होते. त्रेतायुगात यज्ञ, द्वारपायुगात अर्चन तर कलियुगात नामस्मरण हे त्या ईश्वराच्या जवळ जायचे साधन मानले जाते. ध्यान, यज्ञ, अर्चन ह्या कठिन गोष्टी मानवाला सहज़ शक्य होत नाही. जसा काळ बदलत गेला तसा त्या ईश्वराला जवळ घेण्याचा मार्ग देखील त्यानेच बदलवला.नामस्मरण हा सर्वात सोपा मार्ग आहे त्याच्या भक्तीमध्ये डुबुन जायला.
भक्त आणि देव ह्यांच्या मध्ये कोणताचा एजेंट नसतो. फक्त नामस्मरण हे एकमेव साधन अस आहे जे त्याच्या जवळ आपल्याला घेऊन जाऊ शकतो. नामस्मरणाला काळाचे बंधन नाही, वेळेचे बंधन नाही. वाल्मिकी ने रामऐवजी मरा म्हटले तरीसुद्धा वाल्याचा वाल्मिकी झाला.
भक्ती पालांडे


Comments
Post a Comment