अध्याय दुसऱा सारांश



         काकासाहेब दीक्षित हेमाडपंतांना भेटतात ते हेमाडपंतांना शिर्डीगावतील साईंचा महिमा सांगतात. त्यांच्याकडून शिर्डीला यायचा वचन घेतात हेमाडपंत जान्यास तयार होतात पण त्याचवेळेस त्यांच्या मित्राच्या मुलाचा मृत्यु होतो. त्यांचा मित्र हा निससीम गुरु भक्त असतो. त्याच्या मुलाच्या आजारपणात तो खुप उपासतपास करतो. मुलाला बर वाटाव म्हणून तो त्याच्या मुलाला त्याच्या गुरुच्या बाजूलाही ठेवतो. पण सर्व करुनही त्याच्या मुलाचा मृत्यु होतो.आणि ही सर्व परिस्थिति पाहुण हेमाडपंत शिर्डीला जान्याचे टाळतात.
             नंतर काही दिवसांनी नानासाहेब चांदोरकर हेमाडपंतांना भेटतात ते देखील शिर्डीतील साईंचा महिमा हेमाडपंताना सांगतात. हेमाडपंत त्वरित शिर्डीत जान्यास निघतात. ते बांद्राहुन दादरला जाऊन मनमाड़ची ट्रेन पकड़नार असतात पण इतक्या चालत्या गाडीत एक गृहस्थ चढ़तो आणि त्यांना बोरीबंदरला जा असे सांगतो. त्या व्यक्तिवर विश्वास ठेउन हेमाडपंत बोरीबंदरहुन शिर्डीस जातात.
             इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ते म्हणजे काकासाहेब आणि नानासाहेब ह्या दोघांनी ही हेमाडपंताना साईं महिमा सांगितला म्हणजेच काय तर साईंच अनुभव संकीर्तन केले एका सद्गुरुविन भक्ताला भक्तीचा मार्ग दाखवला. तसेच एका परक्या व्यक्तिवर विश्वास ठेऊन हेमाडपंत त्या मार्गावर जातात म्हणजे त्यांना इथे विश्वास पटतो की ते चुकीच्या मार्गावर जाऊ शकत नाही. जिथे साईंचरणी विश्वास ठेवला तिथे मार्ग चुकुच शकत नाही.
     हेमाडपंत शिर्डी गावी येताता. तांग्यातून उतरता तेवढ्यात तात्या साहेब नूलकर बाबानचे परम भक्त निरोप घेऊन येतात. 
आलेची बाबा मंडळीनिशि | वाडियाचे कोपयर्रहपाशी |
चला आधी धुळभेटिसी | मग ते लेंडीसी निघतील ||135|| 
○      हेमाडपंत गाडीतून उतरल्यावर लगेचच त्यांना हा निरोप भेटतो. हेमाडपंताना भेटण्यासाठी स्वतः साईं अर्ध्या वाटेपर्यंत चालून आले होते. भक्तांइतकीच आतुरता देवालाही असते म्हणून तर पंढरीचा विठूराया त्याच्या भक्तांची वाट बघत कंबरेवर हाथ ठेऊन विटेवर उभा आहे. 
○        " चला आधी धुळभेटीसी " ह्याचा अर्थ बाबाना भेटण्यासाठी आणि त्यांच्या चरणांचे दर्शन घेण्यासाठी. पण हे चरण दर्शन फक्त नमस्कार करुन नाही तर पूर्णः त्याला शरण जाऊन आणि तेहि त्याला लोटांगण घालून. ओवी क्रमांक 135 आहे. 1+3+5=9 याचाच अर्थ नाथसंविध. गुरु चरणांशी सर्व आयुष्य समर्पित केल्यावर त्याचे नाथसंविध होणारच. साईं दर्शन घेतल्यावर हेमाडपंताना नवीन आयुष्य मिळाल्यासारखे वाटत होते जे ऐकले होते त्यापेक्षाही प्रत्यक्षात साईंचे रूप खूपच तेजस्वी आणि अद्भुत होते. तो एकमेव आपला उद्धार करू शकतो. 
             " उदधरेदात्मनात्मानं "गर्जे स्वये स्मृतिवचन |
त्याचा अनादर करुन |तरुन जाणे अशक्य ||160 ||
ओवी क्रमांक 160 अध्याय दूसरा 
160+2=1+6+0+2=9 म्हणजे नाथसंविध 
जेव्हा आपण त्याचा प्रत्येक शब्द नीट एकतो त्याचा अवलंबन करतो तेव्हा मोठी आई आपल नाथसंविध करतेच. 
      त्याच दिवशी सायंकाळी हेमाडपंत आणि बाळासाहेब भाटे ह्यांच्या मध्ये गुरु कशाला हवा? ह्या विषयावार वाद झाला 
आपण आपल्या विचारांच्या, राग, क्रोध, मत्सर, मोह ह्या सर्वांच्या जाळयात अडकलेले असतो. ह्या भावना किंवा अहंकार, गर्व, माज ह्या सर्वानमध्ये आपण गुंतलेलो असतो म्हणजे आपण ह्याच्या दबावाखाली असतो. पारतंत्र म्हणजे नक्की काय तर एखाद्याच्या दबावाखाली राहने. तो सांगतो तेच ऐकणे, करने. गुरु आपल्याला ह्या सर्वातुन दूर करतो. कधी अध्यात्माच्या वाटेवर तर कधी विज्ञानाच्या वाटेवरुन तो त्याच्या बाळाला भक्कम बनवत असतो. मानवी मनावर ताबा करण्यासाठी त्याच्या मनात भीति उत्तपन करने गरजेचे असते अशी भीति दूर करण्याच काम गुरु करतो.   
        बाळाला योग्य तो मार्ग दाखवन्याच काम फक्त गुरुच करू शकतो.ज्याचे कार्य आहे ते त्यानेच करायला हवे. जर आपण आयत्या गोष्टीची वाट पाहत राहीलो तर काहीच होणार नाही. हे सर्व कार्य योग्य वेळी, योग्य त्या ठिकाणी योग्य त्याच व्यक्तिशी करुन घ्यायचे काम गुरु करतो. आपले काम आपल्याला माहित असते पण त्याचा मार्ग गवसत नसतो. हा मार्ग दाखवन्याचे काम गुरु करतो.
           प्रारब्धाशी लढन्यासाठी त्यातून बाहेर काढ़न्यासाठी गुरु खुप महत्वपूर्ण आहे.भुतकाळातल्या गोष्टीना मागे टाकून भविष्यकाळ सुधरवन्याचे काम गुरु करतो.नकारात्मकतेकडून सकारात्मकते कड़े नेणारा सद्गुरु असतो. गुरु का हवा ह्याची अनेक कारणे आहेत त्याची यादी करने कठिन आहे.
                गुरु कशाला हवा? ह्या प्रश्नाच उत्तर आपण गुरुच्या सानिध्यात आल्याशिवाय कळणार नाही. गुरुचे प्रेम त्याची माया बाळाविषयी त्याच्या मनात असणारा कळवळा ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी त्याच्या सहवासाची तितकीच गरज असते. त्याच्या प्रेमाला अनुभवण्याची संधी हातून सुटता कामा नये. मनाला शांतता देणारे त्याचे कारुण्याने भरलेले नयन त्याच्या गोड़ आठवणी अनुभव सदा मनात साठवुन ठेवल्या पाहिजेत . 
दैव थोर की कर्तुत्व थोर | वाद चालला हा घनघोर |
केवळ दैवावर टाकूनी भार |काय होणार मी म्हणे || 156||
          थोरत्व कोणाला द्यायचा हा वादच नाही. सृष्टीचा निर्माता त्याच्या आज्ञेशिवाय काहीच होऊ शकत नाही. माणसाच कर्तुत्व हे त्याच्या प्रारब्धावर त्याच्या मेहनतीवर त्याला लागलेल्या संगतिवर त्याच्या विचारांवर आणि अनेक किती तरी गोष्टींवर अवलंबून असते. त्याचे प्रारब्ध कमी करण्याचे काम गुरु करतो. त्याच्या मेहनतीच्या चक्राला वेग देण्याचे त्याची संगत योग्य त्या व्यक्तिसोबत जोडण्याचे त्याच्या विचारांना बद्लवण्याचे काम तो एकमेव करतो. दैवावर भार टाकायचा म्हणजे नक्की काय तर आपली काळजी, चिंता, भीति सर्व त्याच्यावर सोपवून आपण मोकळ व्हायच. सर्व कर्ता करविता तो आहे. आपल्यापेक्षा आपली सर्वात जास्त काळजी त्याला आहे.हा एकच विचार केला तर दैव थोर की कर्तुत्व थोर हा वादच मुळी नष्ट होईल. 
        बाळासाहेब भाटेंसोबतचा वाद सुटता सूटत न्हवता. हे जानून हेमाडपंत मशिदित गेले. तेथे बाबानी त्यांना पाहून काकासाहेबांना विचारले 
"काय चालले होते वाड्यात |वाद कशाचा होता भांडत|काय म्हणाले हे हेमाडपंत |" अशा शब्दात विचारपूस केली.हेमाडपंतानी विचार केला बाबाना हे सर्व कसे कळले. 
 वाड्यापासूनि मशीदीपर्यंत |मध्यंतरी अंतर बहुत |    
  बाबांसी कळले कैसे हे वृतत|आश्चर्यचकित मी मनी||167||
         वाड्यापासून मशीदीपर्यंत अंतर खुप होते. तरी वाड्यात झालेले भांडण बाबांना कसे कळले?  इथे हेमाडपंताना बाबा खुप गोड़ अनुभव देतात. भक्त लांब असू दे किंवा जवळ असू दे त्या भक्ताच्या वेदना त्याचा त्रास सुख दुख शंका सर्वच त्याला कळतात. अंतर हे फक्त प्रमाण झाले खरा तर आपल्या भक्तासोबत पुढे काय काय होणार आहे हे सर्व सद्गुरुला आधीच माहित असते. प्रारब्धाच्या घड्या उघडून त्याला योग्य वाटेवर आणायचे काम गुरुशिवाय कोणाला उत्तम जमणार. 
          साईंचा हाच महिमा जाणून हेमाडपंताना साईंसत्चरित्र लिहायची बुद्धि स्फुरली. 
भक्त जी जी सेवा कल्पिती | संत स्वयेंचि करवूनी घेती|
भक्त केवळ कारण निमित्ती | सकळ स्फूर्ति संतांची ||19||
तो एकमेव असा आहे की जो बाळाची भविष्याची स्थिति जाणून वर्तमानातच त्याच्याकडून सेवा करुन घेतो. जर येणारी स्थिति भयंकर असेल तर त्यानुसार सद्गुरु त्याच्याकडून योग्य ती सेवा करुन घेतात. आणि भविष्यात आनंद देण्यासाठी वर्त्तमानकाळापासूनच त्याचे प्रारब्ध कमी करतात. 
ओवी क्रमांक 19:1+9=10=1+0=1
म्हणजे तो एकमेव तारणहार आहे. तो एकमेव असा आहे जो त्याच्या बाळासाठी काहीही करू शकतो. 
माझी करोनिया लेखणी |बाबाचि गिरवीतील माझा पाणी |
मी तो केवळ निमित्ताला धणी |अक्षरे वळवितो ||44||
अध्याय 2रा ओवी क्रमांक 44.
2+4+4=10 तो एकमेव 
मी म्हणजे पेन, मी म्हणजे शाइ. पेन आणि त्यातील शाइ म्हणजे मी. पण त्या पेनाला म्हणजे लेखनीला गिरवनारा हा माझा सद्गुरु साईंनाथच आहेत. हेमाडपंत म्हणतात मी मूढ़ आहे. मला साईंनबद्दल कुठे काय माहित आहे. मी तर त्यांच्या नखाइतकापण ज्ञानी नाही. ज्याप्रमाणे समुद्राचे पाणी आपण मोजु शकत नाही त्याचप्रमाणे सद्गुरुचे ज्ञान आपण मोजु मापू शकत नाही. त्यांच्या बद्द्ल आपण काहीच लिहू शकत नाही आणि जर लिहलेच तर ते लिहून घेणारा सर्वस्वी तोच असतो. 

मीपणा समर्पिता पायांवर |सौख्य लाधेल अपरंपार |
सकळ सुखाचा संसार |अहंकार गेलिया ||64||
हेमाडपंत ह्या अध्यायात म्हणतात माझी बुद्धि नाठाळ झाली आहे मुखाने फक्त वटवट होते. मला माझे अंतरंग ओळखता येत नाही मी मूढ़मति आहे. मी अज्ञान आहे. हेमाडपंतांनी स्वतःतले सर्व वाईटगुन साईंचरणांशि अर्पण केले. 
         माणूस नेहमी मी हे केला, मी ते केल, माझ्यामुळे हे सर्व शक्य झाले अस म्हणत मीपणाचा टेंबा मिरवत असतात. ओवी क्रमांक 64 =6+4=10=1+0=1 
सर्व करता करवीता तो एकमेव आहे. हां मीपणा आणि अहंकार जर प्रत्येकाने त्याच्या चरणांशि अर्पण केला तर प्रत्येकाला सुख लाभनारच आहे. 
ऐसी मनात उदेली वृती | माधवरावांचे कानावरती 
घातली परी साशंक चित्ति | कैसे मजप्रति साधे है | |48||
        वरील ओवी वरुण एक गोष्ट स्पष्ट होते. हेमाडपंतानच्या मनात साईंविषयी कथा लिहण्याची इच्छा उत्पन्न होते. पण बाबांशी बोलण्याचा त्यांचा धीरच होत नाही. म्हणून त्यानी माधवरावाना बाबांची अनुमति घ्यायला सांगितली. पण त्या आधीच बाबाना सर्व कळले होते. बाळाच्या मनात काय चालले आहे तो कोणत्या व्यवस्थेत अडकला आहे हे गुरुला सांगण्या आधीच तो ओळखतो.
तेराव्या शतकात दौलताबादच्या जाधवांनी राज्य वैभव वाढवून महाराष्ट्राचा गौरव केला. राजारामचंद्र व राजामहादेव ह्याचा मंत्री हेमाद्रि हा अतिशय कुशल व बुद्धिमानी होता. धर्मशास्त्र ग्रंथकार होता. उदार व व्रतदान करण्यात तो पुढारलेला होता. चतुवर्रगर्रचिंतामणि ग्रंथ त्यांनी रचला होता. हेमाडपंतांना झालेल्या अभिमानाचा खंडन होण्याकरता आणि योग्यतेवीणा जी बड़बड़ केली होती त्या सर्व गोष्टीचा विचार करुन साईंनि "हेमाडपंत" हे नाव दिले. ह्या नावावरुण साईंना हेमाडपंताना शिक्षण द्यायचे होते. वादावाद करुन काहीच सिद्ध होत नाही. अहंकारी नको नीरअभिमानी असावे. आणि इथेच आपल्याला कळते की गुरु का असावा. गुरुवीणा ज्ञान किंवा परमार्थ नाही हे शास्त्रशुद्ध आहे. 
भक्ती पालांडे 

Comments