धावून धावून थकलो असता हाचि घरी आला
प्रयत्न काय असतो ❓️धडपड काय असते ❓️कठिन काळ वाईट परिस्थिति.. ही सर्व तू भेटण्याआधीची स्थिति होती. म्हणून तर पीपा म्हणतात..
भावला अनिरुद्ध मजला
धावून धावून थकलो असता हाचि घरी आला
बाबा तू घरी आलास आणि माझा वाईट काळ जसा काही तोंड घेऊन निघून गेला. मी काहीच केला नाही फक्त एकदा तुझ नाव घेतल. आणि माझ्या एका सेकंदाच्या विश्वासापोटी तू माझ्यासाठी धावतच आलास. माझ्या घरपर्यंत आलास.
हाचि घरी आला म्हणजे काय ❓️माझ्या सोबत माझ्या घरच्यांची काळजी घ्यायला हा घरपर्यंत आला.
भावला :भाव +आला =माझ्या भोळ्या भावाला भूलून तो आला. पण बाबा मी खुप स्वार्थी आहे. जेव्हा माझा काम अडुन राहत तेव्हा तेव्हा मी तुला आवाज देतो. पण तू मात्र किती रे भोळा... माझ्या एका सादेला पण तू लगेच धाऊन येतोस.
प्रसंगी हाचि रे उभा ठाकतो
हाथ पसरूनी जवळी घेतो
निर्णय आमुचे चुकले असता, हाचि मध्ये आला ||1||
अड़-अडचणीच्या काळात नातेवाईक, शेजारी मित्र इतकेच काय तर कुटुंबीय सुद्धा माझ्या सोबत नसतात. पण dad तू मात्र खूपच वेगळा आहेस. कितीही बिकट परिस्थिति असली तरीही माझ्या सोबत असतोस. कसलाही विचार न करतात माझ्या प्रत्येक संकटात तू माझ्या सोबतीला असतोस.माझ्या डोळ्यातून अश्रु खाली ओघळण्याआधीच तू त्याला अलगत झेलतोस. अमृताची उपमा त्या अश्रुच्या थेम्बाला तू देतोस. ते माझे अश्रु ही तू पितोस. आणि आम्ही तुझ्या अभंगावर थरकताना पण 10 वेळा विचार करतो. कोण्ही बघत तर नाही ना ❓️कोण्ही पाहिल तर काय बोलेल ❓️इतकच काय तर सेवा करतानाही वेळ मोजतो. चार तास सेवा केली अस खुशाल बोलतो. तुझ्यावर केलेले प्रेम पण तुलनाकरुन काढून दाखवतो. थोड़स संकट आल की डगमगतो. पण तू मात्र नि :शंकपणे तासंतास आमची सेवा करतोस. प्रसंगी हाचि रे उभा ठाकतो. मित्राच्या वडिलांसाठी 7 मिनिटात शिवडीच्या दवाखान्यात पोहचनारा आमचा बाबा आमच्यासाठी हाथ पसरून आम्हाला जवळ घ्यायला नेहमी तयारच आहे. शिक्षण क्षेत्रात व्यावसायिक क्षेत्रात इतकच काय तर छोट्या छोट्या आमच्या निर्णयांमध्ये पण तू सहभाग घेऊन तू सर्व निर्णयाना तू योग्य मार्गी लावतोस. बाबा तू आहेस म्हणून एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे "मी घेतलेला निर्णय हां माझा नसून सर्वस्वी माझ्या हरिचा निर्णय आहे. "
कधी कुठे मी काय करतो |
काय बोलतो काय वागतो |
कितीही चूका त्या घड़ल्या असता, हाचि साहय झाला ||2||
बाबा,कधी कधी मी काय करतो हे मलाच कळत नाही.परिस्थिति माझा मार्गच बदलते. कठिन काळ आला की मी माझ देह-भान विसरतो.नको त्या गोष्टीना बळी पडत जातो.मार्केट मध्ये आलेल्या वेगवेगळ्या पैशाच्या स्कीमला मी स्वीकारत जातो.अडाणी लोकांसारखा कसलाच विचार न करता मी प्रत्येक एक निर्णय घेत जातो.संकटात देव आठवतो आणि सुखात देवाचा विसर पडतो ही नेहमीच माणसाची वृति आहे.आणि मी ही तेच करतो.माझ्याकडे तू असतानाही मी कसलाच विचार करत नाही.उलट स्वत:च्याच अकलेचे घोड़े पळवत पुढे पळत राहतो अन मनात हा विचारच येत नाही की ही घोड़ी आणून देणारा तूच आहेस तिला चारापानी देणारा तूच आहेस.इतकेच काय तर तिला लगाम लावणाराही तूच आहेस.माझे मन जर माझ्या ताब्यात नसेल तर त्या धावणाऱ्या मनाला ताब्यात ठेवणारा तू एकमेव घोड़स्वार आहेस, ही साधी गोष्ट मी विसरतो आणि नको ते निर्णय घेतो. फक्त निर्णय घेऊन मी तिथेच थांबत नाही तर माझे निर्णय मी इतर सर्वांवर लादतो. मी काय बोलतो, काय करतो ह्याचे मलाच भान राहत नाही. मी स्वतः तर चुकीच्या मार्गावर चालतोच पण माझ्यासोबत मी इतरांनाही त्याच चुकीच्या मार्गावर चालन्यास भाग पाडतो.साईनाथानी दिव्यासाठी तेल मागितले तेव्हा एका कुविचारी वान्याने सर्व वाण्याची बुद्धि त्यांची मती फिरवली आणि बाबाना तेल देण्यापासून सर्वानी नकार दिला.माझ्या फक्त कृतीतुनच नाही तर माझ्या वागन्या -बोलण्यातुनही मी चुकीचे कृत्य करतो. माझ्या मनाचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षाही अधिक आहे. भविष्याची चिंता करत, भूतकाळाचा पाठपुरावठा करत आणि दुनियादारी करत माझ्या मनातले विचार इतके वाढतात की, मला चांगले आणि वाईट हयातला फरकच मुळी उमगत नाही आणि मग मी घाईगड़बडित चुकीचा निर्णय घेऊन मोकळा होतो. हा हनुमंत माझ्या मनात बसलेला असताना मी मात्र स्वतः ला हनुमंत समजून स्वतः च्या विचारांना द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी बूटीच्या रुपात सजवून उंच आकाशात उड़त असतो. आणि उड़ता उड़ता चुकांवर चूका करत जातो. ह्या चूका घड़ण्याचे एकमेव कारण म्हणजे माझ्या मनातील नको ते विचार. संसार करूनही परमार्थ करता येतो हा विचार साईंनी आपल्या मनावर ठसवला आहेच. संसाराच्या प्रत्येक चटक्यासोबत परमार्थ घड़तोच आहे, पण परमार्थच्या प्रेमासोबत संसारही आनंदाने फूलतो आहे. परमार्थचा विचार न करता आपण फक्त संसाराचे चटके सहन करत बसतो. आणि हे चटके सहन करत परत नवीन चूका करतो.
मात्र ह्या चुकानमुळे म्हणजे आमच्या प्रारब्धामुळे आम्हाला जी शिक्षा मिळते त्याने सुद्धा आमच्यामध्ये काहीच बदल होत नाही. उलट आमच्यातला गर्विष्टपना, मीपना अजुन वाढतच जातो आणि हा मीपना इतका वाढतो की देवीदासची भूमिका घेऊन तू माझा म्हणजे माझ्यातील जव्हार अलीचा भ्रमाचा भोपळा फोड़नयासाठी तू सगुन साकार रुपात माझ्यासामोर उभा राहतोस. माझ्या चुकाना वैतागुन माझे आपले म्हणून मिरवनारे माझे नातेवाईक, माझे सगे -सोयरे, मित्रपरिवार मला सोडून जातात. मी इतका त्रास दिलाय की माझे कुटुंबही मला सोडून जाते. आणि मग मी एकटाच राहतो. मी इतका एकटा पडतो की आत्महत्या सारखे नीच विचार माझ्या अवती -भोवती नाचू लागतात. यमाचा रेड़ा माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि हनुमंत बनुन उंच आकाशात उड़नारा मी एका झटक्यात खाली पडू लागतो, पण पड़ता पडता ही तू माझ्यासाठी पुष्पक विमान पाठवतोस आणि मला अलगत झेलतोस. माझे डोळे पुस्तोस, मला जवळ घेतोस मायेने माझ्या डोक्यावरुण तुझा प्रेमाचा हात फिरवतोस परत अलगत जमिनीवर आणून ठेवतोस आणि जुन्या गोष्टींचा बापू तू मला विसर पाडतोस. तुटलेली नाती हळुवार प्रेमाने जुळवतोस. माझ्या कठिन काळात बापू मी सहायता न मागता बापू तूच धावत येतोस. बाळाने बापाला एकदाच आवाज दिला पण बाप मात्र बाळासाठी धावतच राहिला. वेळोवेळी बाळाच्या पाठीशी नाही तर सोबत बाळाला सहाय्य करण्यासाठी त्याचा हा सद्गुरु सगुण रूप घेऊन धावत आला.
परमप्रेम तो शुद्ध ब्रम्ह तो |
भक्तासाठी धरणी येतो |
ओळख ह्याची पटली असता,त्रिविक्रम दिसला
पिसाला त्रिविक्रम दिसला || 3 ||
परमप्रेम म्हणजे भगवंतावर केलेले निस्वार्थी प्रेम.तुलसीपत्र क्रमांक 1539 मध्ये ब्रम्ह ह्या शब्दाचा अर्थ श्रद्धावानासाठी 'ईश्वरी प्रेम व शांतिसहित आनंद 'असा आहे आणि स्वयंभगवान श्रीत्रिविक्रम हाच त्रि-नाथांमधील प्रेम असल्यामुळे श्रद्धावानासाठी जेथे जेथे ब्रम्ह शब्द येतो,तेथे तेथे श्रद्धांवानानी भगवान त्रिविक्रमास जाणावे.निखळ प्रेम,प्रसन्न शांति आणि समाधान ही स्वयंभगवान त्रिविक्रमाची तीन नित्य पावले आहेत.
त्रिविक्रमाचे वाहन म्हणजे आई जगदंबेचा आशीर्वाद,सहजशिवाचा वरदहस्त व दत्तगुरुंची कृपा (संदर्भ :तुलसीपत्र क्र :1458)
अंबज्ञ ह्या रुपात त्रिविक्रम माझी नाळ त्रि-नाथांशी जुळवतो,नाथसंविध ह्या रुपात तो त्रि-नाथांची माझ्यासाठी असलेली योजना माझ्या जीवनात राबवतो आणि त्रिविक्रम ह्या रुपात तो माझा उद्धार करतो,हेच त्याचे अनिरुद्ध सामर्थ्य आहे.
शुद्ध आणि पूर्ण प्रेम हेच माझे लाडके भजन आहे.त्रिविक्रमाची शक्ति त्याच्या आताच शमा रूपाने अभिन्नापणे राहते आणि प्रार्थना रूपाने तीच भक्ताना सदैव त्याच्याशी जोड़ते.(संदर्भ :तुलसीपत्र क्र :1461 आणि 1463)
Dad तुझ मोठ्या आईवर किती भरभरून प्रेम आहे.आम्हाला ही तुझ्यावर आणि मोठ्या आईवर तसच प्रेम करायच आहे.तुझ्या प्रेमात नदिच्या वाहत्या पाण्यासारखी निखळ स्वच्छता आहे.तू आमच्यामधली आसक्ति दूर करुन तुज्यासारखेच परमप्रेम आम्हाला शिकव.आम्हाला तुझ्यावर तसच प्रेम करायच आहे.विवेक आणि वैराग्य तू आम्हाला शिकव. ह्या विश्वातील पवित्रता जशी तू जपली आहेस तशीच पवित्रता जपन्यास तू आम्हालाही शिकव.तुझ्यातील नम्रता, प्रेम, आपुलकीची भावना आमच्यातही वसु दे. माउली आमच्या मनाला कितीही ताब्यात ठेवन्याचा आम्ही विचार केला तरीही ते होत नाही. चुकानवर चूका घडतात.बाबा आम्हाला तुमचा प्रत्येक शब्द पाळायचा आहे त्याचे अनुकरन करायचे आहे.बाबा तुझ्या बाळाला साध खरचटल तरीही सर्वात पहिला धावत येणारा तूच असतोस.म्हणून तर दैवी अवतारातून तू मानवी अवतार धारण केलास आणि श्रीखंड्या बनुन बारा वर्षे तुझ्या बाळाच्या घरी राबलास.कधी नरसिंह,कृष्ण,विष्णु,साईं तर कधी राम अवतार घेतलास.मैला मैलाचे अंतर सहज़ पार करुन तू एका क्षणात बाळाच्या हाकेसाठी धरणीवर येतोस.तुझे बाळाविषयीचे प्रेम,कळवळा पाहून तो जाणून मिना वहिनीचे अष्टभाव जागृत झाले.अर्थात ते तू करुन घेतलेस.मिना वहिनीची तुझ्या प्रति असणारी भक्ती,प्रेम,अनुभवुन तर तू तुझे कफनी घातलेले साईंरूप प्रकटवले.
श्रीरामांचे कोदंड धनुष्य व अक्षयमाला,श्रीकृष्णाचे शंख व चक्र ह्या दोघांचेही पवित्र पीताम्बर व अभयमुद्रा धारण केलेले त्रिविक्रमाचे एकमुखी व चतुर्भुज स्वरूप म्हणजे 'फक्त भक्तिला वश होणारे,केवळ श्रद्धावानासाठी असणारे,सर्व नियम तोडून निव्वळ श्रद्धावानांचेच रक्षण करणारे आणि तरीही नीति अबाधित राखनारे, श्रीराम व श्रीकृष्ण ह्यांचे एकरूप, एकत्र व एकाकार स्वरूप आहे. मात्र कलयुगात त्या कठिन परिस्थितीत कार्य करताना भगवान त्रिविक्रम नेहमीप्रमाणेच साध्यासुध्या मानवाच्या रूपातच कार्य करेल मात्र त्या साध्यासुध्या रूपाचे ध्यान करणाऱ्या 'हेच 'एकमुखी व चतुर्भुज स्वरूप दिसेल. (संदर्भ :तुलसीपत्र क्र :1466 आणि 1486)
म्हणूनच पिसा अभंगाच्या शेवटी म्हणतात,ओळख ह्याची पटली असता त्रिविक्रम दिसला,पिसाला त्रिविक्रम दिसला..
हरी ॐ श्रीराम अंबज्ञ
भक्ती पालांडे

Comments
Post a Comment