एकवेळ तू सहजचि ये रे, अनिरुद्ध मम घरी | आगमनाची वाट पाहतो, दे मज तुचि सबूरी ||


पी -पी पियु, पी -पी  पियु असा खणखणीत आवाज काढणारा चातक पक्षी जसे पावसाच्या एका थेंबाची वाट पाहतो. शेतकरी त्याच्या शेतातील धन -धान्याची वाट पाहतो. खेळाडू टूर्नामेंटची कलाकार त्याच्या कलेला कसा वाव मिळेल ह्याची वाट पाहतो. माणूस सुखाची वाट पाहतो. भोळे भाविक गणरायाची नवरात्रिची वाट पाहतात. तसेच बापू आम्ही तुझी वाट पाहतो. ही वाट पाहता पाहता न कळत मुखातून येते... 
          एकवेळ तू सहजचि ये रे, अनिरुद्ध मम घरी |
           आगमनाची वाट पाहतो, दे मज तुचि सबूरी ||
        हे सद्गुरुराया तुम्ही माझ्या घरी कधी येणार. तुमच्या आगमनाची मी आतुरतेने वाट पाहतेय. शबरीने जशी श्रीरामाची वाट पाहिली होती तशीच मी तुझी वाट पाहतेय. दारासमोर रांगोळ्याची रास घातली आहे. फुलांच्या माळा तयार आहेत. गोडीचे आप्पे तयार आहेत. तुम्हाला आवडते ते केसर पाणी पण तयार आहे. जेवनाचाही घाट घातला आहे. आता फक्त तुम्ही या. माते शबरी सारखी आणि बंधु भरतसारखी सबूरी आमच्यात उरली नाही. तुमच्या श्रीचरणांचे दर्शन घ्यायला मन आतुर झालाय.तुमची सेवा करायला उर भरून आलय. साध्य आणि सिद्धता आता तुम्हीच पूर्ण करा.आमच्या मनाता आता सबूरी तुम्ही निर्माण करा. गहिवरलेल्या मनाला तुम्हीच शांत करा. कवाडे उघड़ी केलीच आहेत आता घरी येऊन माझ घर धन्य धन्य करा. तुमच्या चरणांना माझ्या हृदयी घट्ट बसवा. माउली तुम्ही नेहमीच माझ्या घरी असता पण नेहमीच कार्यरत असता. कधी प्रारब्धांना कमी करता कधी माझ्यावरील संकटाना म्हणून राया आज सहजच माझ्या घरी या पण हो आरामासाठी या  विश्रांतिसाठी या... पाहुने म्हणून नाही तर आपल म्हणून हक्काने या... बाबा एक दिवस नाही तर रोज रोज आरामासाठी या खंड्याच्या रुपात तू एकनाथांच्या घरी बारा वर्षे राबलास. आता मला राहवत नाही माउली तू माझ्या झोपडीत ये. आणि तू येई पर्यंतचा जो वेळ आहे त्या वेळात तू माझ्या मनाला शांति दे सबूरी दे. कारण त्या नंतरचा सगळा वेळ मला माझ्या सद्गुरु रायाच्या कृपाछत्राखाली घालवायचाय. 
       बापूराया लवकर ये.. 
भक्ती पालांडे 

Comments

Popular posts from this blog

अध्याय दुसऱा सारांश