अध्याय तिसरा -भाग दोन -रोहिला कथा
रोहिला कथा
शिर्डीमध्ये रोहिला नावाचा एक गृहस्थ आला होता. त्याला बाबांच्या प्रेमाने मोह पाड़ला होता. धष्ट -पुष्ट शरीर रचना असलेला रोहिला कोणालाच जुमानात नसे. अगदी साधे राहणीमान असलेला रोहिला शिर्डीत मशिदित येऊन राहिला होता . अंगात कफनी पायघोळ अश्या साध्या पोशाख तो शिर्डीत आला होता. रात्रं-दिवस तो जोर जोरात कुराणातील कमले वाचत असत. कधी मशिदित तर कधी चावडीत बसून तो जोर जोरात वाचन करत असे. दिवस रात्र उन्हातान्हात शेतात खपणारया लोकांना रोहिल्याच्या आवाजाने शांत झोप येत नसे. सर्वच जान रोहिलाला फार कंटाळले होते.बाबा प्रेमळ आहेत कण्वाळु आहेत ते रोहिलाला काहीच बोलणार नाही. मध्यरात्रि रोहिल्याच्या आवाजाने ग्रामस्थांची झोप मोडायची. बाबाना रोहिल्याच्या आवाजाचा कंटाळा येत नसे;पण त्याच्या आवाजाने बाकि सर्वाना खुप त्रास होत असे.
रोहिला माथेफिरू होता;आणि बाबांचा तो जवळचा होता. बाबांच्या प्रेमाने त्याला अजुनच ताकद मिळाली होती गावातल्या लोकाना विरोध करायची. तो बेफानपणे त्याला विरोध करणाऱ्याना उलट उत्तरे देत असे. त्यांच्या सोबत दोन-चार हाथ करत असे.अन्यायाच्या विरोधात लढण्याचा विश्वास त्याच्यामध्ये बाबानमुळेच आला होता. त्याच्या अश्या वागण्यामुळे गावही आता त्याच्या विरोधात जाऊ लागला होता. गावातल्या सर्वानी बाबांकडे रोहिल्याविरोधात तक्रार केली पण ती माउलीच काय जी आपल्या बाळाच्या विरोधात उभी राहिल.त्या कण्वाळु माऊलिने रोहिलाला पाठीशी घालत ग्रामस्थांनाच विरोध केला. तुम्ही रोहिलाला सतउ नका. तुमच्या विरोधामुळे त्याच्या पठणात व्यथा येतेय त्याला त्रास देऊ नका. त्या रोहिल्याची बायको त्याच्या सोबत नांदत नाही ती माझ्याकडे त्याला येऊ देत नाही. जर तो ओरडायचा थांबला तर ती त्याला त्रास द्यायला लागते. ती दुर्बुद्धि स्त्री ह्याचा आवाज ऐकुन पळून जाते. आणि जेव्हा ती दुर्बुद्धि विनाशकारी स्त्री पळून जाते तेव्हा मला सर्वात जास्त सुखसमृद्धि लाभते. त्याच्या वाटेला कोण्हीही जाऊ नका. त्याला जितके ओरडायचे तितके ओरडू दया. त्याच्या ओरडण्यामुळे मला शांति भेटतेय.
तो जितका ओरडेल तितका त्याला ओरडू दया तो ओरडेल आणि मग थकला की शांत बसेल. बाबानी रोहिलाला पाठिंबा दिलेला पाहून गावातल्यांचा आता नाविलाज झाला. फाल्गुन महिन्यात देखील रोहिला असेच जोर जोरात कमले वाचत असे ते पाहून सर्वाना आश्चर्य होत असे ह्याच्या घशाला कोरड कशी पडत नाही ह्याला ओरडण्याने त्रास नसेल का होत. बाबा किती दयाळू आहेत. खर तर ही सर्व बाबांचीच लीला होती झोप प्रिय असणाऱ्या सर्वाना त्या भगवंताच्या नामाशी जोडायचे होते.
रोहिल्याची बायको नव्हती बाबांनी ती कथा त्यांच्या बाळांच्या वाईट सवयींसाठी बनवली होती. "रोहिल्याची बाईल घरघुशी "म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये आणि मनामध्ये वाईट व चुकीच्या संकल्पना प्रवेश करायला वेळ लागत नाही त्या वाईट सवयीना, विचारांना बाबांनी घरघुशी म्हटले आहे. परिस्थिति कशी ही असू दे विरोधक कितीही असू दे आपण आपले नामस्मरणाचे काम कधीच सोडायचे नाही. रोहिला जोर जोरात पठन करत असल्यामुळे त्या भगवंताचे नाव सर्वांच्या कानात घुमत असे आणि म्हणूनच त्याच्या ह्या ओरडण्याला बाबांनी कधीच विरोध केला नाही उलट ते गोड़ मानून घेतले म्हणजे त्या ईश्वराला कोणत्याही आवाजात केलेले पठन मान्य असते. बाबांनी सांगितलेल्या कथाप्रमाणे रोहिला जेव्हा जेव्हा जोरात कुरान वाचत असे तेव्हा त्याची बायको त्याच्या जवळपास येत नसे म्हणजेच काय तर त्या त्रिपुरारीचे नाव घेतल्यावर कितीही मोठे संकट असू दया कितीही वाईट गोष्ट असू दया किंवा मायाजाळ असू दया त्याची झळ आपल्याला लागणार नाही, आणि विपदा जवळ न आल्यामुळे आपण आनंदीच राहु. रोहिला पठन करताना त्याला अडवनारे बरेच जन यायचे पण रोहिल्याने त्यांच्याकड़े लक्ष दिल नाही याचाच अर्थ चांगल्या कामात अनेक अडथळे येतात त्यांना सामोरे जाऊन आपण आपल काम नेटाने चालूच ठेवायच.
हेतु एकच नामस्मरण करने. ज्या नामस्मरणाने वाल्मीकीचा उद्धार झाला. भक्त प्रल्हादासाठी नरसिंह रूप अवतरला गेला. जनाईच संत जनाबाईत रूपांतर झाल त्या नामस्मरणात किती ताकद असेल हे आपल्याला कळतेच.
भक्ती पालांडे
Comments
Post a Comment