अध्याय तिसरा सारांश

अध्याय तिसरा अतिशय महत्वाचा आहे हयात बाबांच्या मुखीची काही वाक्ये आणि त्यांची वचने ह्यांचा समावेश आहे. नामस्मरणाचे महत्त्व आणि बाबांच्या जवळ जाण्यासाठी हा अध्याय अतिशय उपयुक्त आहे. 
     नामस्मरणाचे महत्व 

नाम संकीर्तन साध पै सोपे | जळतील पापे जन्मांतरीचि ||1||
       तुकाराम महाराज ह्या अभंगात नामस्मरणाचे महत्व सांगतात. नामस्मरण हे सर्वात सोपे साधन आहे जन्मांतरीचि पापे धुवायला. नामस्मरणाने पापे फक्त धुउन नाही तर जळून जातात म्हणजेच काय तर समूळ नष्ट होतात.
  नाम नारायण अंती उद्धारक |नामा म्हणे देख भाक माझी ||
संत नामदेवाच्या अभंगात त्यांनी नामाचे महत्व विशद केले आहे.  भगवंताच्या नामानेच उद्धार होणार आहे. त्याचा फक्त अंश देखील माझा उद्धार करणार आहे. संतांनी नामस्मरणाचे महत्व वेळोवेळी मांडलेच आहे. 
     नामस्मरण हे असे बीज आहे जे उजाड जमिनीवरही ओलावा आणून त्यात बी सहज़ पेरले जाईल. त्या" बी " ला अंकुर फुटुन त्याचा सतत फुलनारे रोपटे येते. ह्या रोपट्याला खत पाणी मिळत ते सेवा आणि भक्तीच. नामस्मरणाचे बी पेरणारे आपण असतो पण त्याला सेवा आणि भक्तीचे खत पाणी देण्याचे काम त्याची उन-पाऊस, वादळ -वारा, पुर -दुष्काळ ह्या सर्वांपासून योग्य काळजी घेण्याचे काम सद्गुरु करतो.आपण एक पाऊल टाकल की तो उरलेली 107 पाउल आपल्यासाठी टाकतोच. 


        सत्ययुगात ध्यान करुन भगवंताला प्रसन्न केले जात होते. त्रेतायुगात यज्ञ, द्वारपायुगात अर्चन तर कलियुगात नामस्मरण हे त्या ईश्वराच्या जवळ जायचे साधन मानले जाते. ध्यान, यज्ञ, अर्चन ह्या कठिन गोष्टी मानवाला सहज़ शक्य होत नाही. जसा काळ बदलत गेला तसा त्या ईश्वराला जवळ घेण्याचा मार्ग देखील त्यानेच बदलवला.नामस्मरण हा  सर्वात सोपा मार्ग आहे त्याच्या भक्तीमध्ये डुबुन जायला. 
           भक्त आणि देव ह्यांच्या मध्ये कोणताचा एजेंट नसतो. फक्त नामस्मरण हे एकमेव साधन अस आहे जे त्याच्या जवळ आपल्याला घेऊन जाऊ शकतो. नामस्मरणाला काळाचे बंधन नाही, वेळेचे बंधन नाही. वाल्मिकी ने रामऐवजी मरा म्हटले तरीसुद्धा वाल्याचा वाल्मिकी झाला. हेमाडपंत पुढील अध्यायात म्हणतात, 

   हरी निजभक्तांचा केला |भाळया -भोळीयांचा भूकेला |
     प्रेमालागी समूळ विकला|सदा हठेला दांभिका ||9||

    ज्याने ज्याने म्हणून त्याला साद घातली त्या सर्वाना त्याने अपनवले. त्याने कोणाचाहि हात सोडला नाही ज्याने त्याच नाव एकदा घेतला त्याने त्याच्यावरही तितकच प्रेम केल. तो फक्त भोळ्या भावाचा भुकेला आहे. स्वार्थी भाव त्याच्यासमोर टिकतच नाही. आणि तो टिकूनही देत नाही. त्याला फक्त आणि फक्त खरे प्रेम आणि विश्वास हवाय. ह्या प्रेमापोटी तो स्वतलाही विकायलाही तयार होतो. भक्त प्रल्हादासाठी ज्या देवाने नरसिंहाचे रूप घेतले तो ईश्वर त्याच्या बाळासाठी काहीही करू शकतो. भक्त प्रल्हादाने फक्त नामस्मरण करुन देवाला साध्यत्वात आणले. ओवी क्रमांक 9.म्हणजे नाथसंविध. हठेला म्हणजे जिद्दी आणि 
 दांभिका म्हणजे पाखंडी तो पाखंडी आणि जिद्दी लोकांच्या पण हाकेला धाऊन जातो. 
​प्रेमे घेइल जो मन्नमा |

​         त्याच्या मी सकल कामा |पूरवी प्रेमा वाढवी ||11||

माधवराव ह्या ओवीत सांगतात, ह्या हरिचे जो नाव घेतो.. नाव कसे घेतो तर मन्नमा. मन्नमा म्हणजे मन +नाम. मनापासून जो ह्या हरिनामात तल्लीन होतो त्याचे सर्व काम पूर्ण होतेच. 
       प्रेमे जो माझे घेई नाम, त्याचे काम सर्व पुरविन 
त्रिविक्रमाची अठरा वचने. जो जो माझे नाव प्रेमाने घेतो त्याचे कितीपन अवघड काम असू दे ते मी पूर्ण करणारच पण कधी पूर्ण करणार जेव्हा ते त्याच्या बाळासाठी योग्य असेल तेव्हाच. 

​कोणीही केल्या माझे कीर्तन |तयासी देईन आनंदघण |
​         नित्य सौख्य समाधान |सत्य वचन मानावे ||14||

      कीर्तन म्हणजे देवाचे नामस्मरण करने. जो जो म्हणून माझे गुणसंकीर्तन करेल त्याला मी सदैव आनंदित ठेवेल, एखाद्या अभक्ताला भक्तीत उतरवण्यासाठी देवाचे गुणसंकीर्तन महत्वाचे असते. स्वतःचे नाम, गुण, स्तुति ऐकुन देव खुश होतो का?... तर नाही. आपल्या नामामुळे स्तुतिमुळे कोणाचा तरी उद्धार होतोय ह्या विचाराने देव खुश होतो आणि म्हणून अशा गुणसंकीर्तन करणाऱ्याला सतत आंनद व समाधान लाभेल असे वचन साईं ह्या ओवित देतात.त्रिविक्रमाची अठरा वचने " माझे नाम माझिया, भक्तास तारेल ".

​  जो मजलागीं अनन्य शरण |विश्वासयुक्त करी मद्भजन |
​         माझे चिंतन माझे स्मरण |तयाचे उद्धरण ब्रीद माझे||15||

आपल्यामध्ये असलेल्या चांगल्या वाईट गुणांसकट त्या परमेश्वराला शरण जाने. 
शरणागत होउनि करी जो गजर |त्याचिया जीवनी सुख अपरंपार || 13 ||....त्रिविक्रमाची अठरा वचने. 
असा भक्त जो मनात कसलीच शंका न करता त्या परमेश्वराला पूर्ण शरण जातो आणि विश्वासाने त्याचे नामस्मरण करतो. मद्भजन म्हणजे माझे भजन करतो. माझे गुणसंकीर्तन करतो माझे चिंतन करतो माझे स्मरण करतो त्याचा उद्धार कसा करायचा त्याचे प्रारब्ध कसे कमी करायचे हे सर्वस्वी मी जाणतो. चिंतन म्हणजे निदिध्यास. चिंतन हे फक्त प्रेमपोटीच होते. चिंतन म्हणजे एकाच गोष्टीचे म्हणजे फक्त त्या परमेश्वराचे ध्यान करने. त्याच्या क्रिड़ाना आठवणे आणि ते आठवणे पण कसे तर प्रेमाने. तो सर्व काही चांगलच करतो ह्या विश्वासाने. चिन्तनासोबत स्मरणही तितकेच महत्वाचे आहे. सद्गुरुंच्या सगुन रूपाचे स्मरण करने. त्याच्या सक्रिय गुणाचे रूपाचे स्मरण करने. स्मरण म्हणजे आठवणीत ठेवणे. जो त्या भगवंताचे मनापासून गुणसंकीर्तन चिंतन व स्मरण करतो त्याचा उद्धार तो परमेश्वर करणारच आहे. अध्याय तिसरा ओवी क्रमांक पंधरा 3+1+5=9नाथसंविध. 

​मी तो केवळ चरणांचा दास |नका करू मजला उदास |
​         जोवरी या देहि श्वास |निजकार्यास साधुनि घ्या ||40||

" नामदेवाची दासी "अस स्वतःला म्हणून घेण्यात जनाबाईना खुप आनंद व्हायचा. जनाबाई ह्या नामदेवाच्या घरच्या दासी होत्या. आणि एक दासी घरी वावरताना अंगन, तुळशीवृंदावन, गोठा, कोठा,  मजघर अश्या जागी वावरायची. पण ही सर्व काम करता करता ही त्या विट्ठलाच्या इतक्या जवळ आली होती की त्यांनी विठ्ठलाच्या रुपात नामदेवाला पाहिल होत. ज्या भगवंताने जनाबाईला दळण दळन्यास केर काढण्यात मदत केली होती त्या पांडुरंगाचे दासत्व जनाइने स्वीकारले होते. 
        हेमाडपंत ह्या ओवित म्हणतात मला फक्त तुझ्या पायांचा दास बनव. मला उदास करू नकोस. "नका करू मजला उदास म्हणजे काय तर मी त्याचं दासत्व कधी स्वीकारु शकतो तर जेव्हा त्याची इच्छा असेल तेव्हाच म्हणून हेमाडपंत म्हणतात मला तुमच्या चरणांचे दासत्व दया मला ह्या चरण सेवेपासून अलिप्त करू नका. दासत्व कोण स्वीकरत जो अज्ञानी आहे. अडानी आहे. ज्यांच्याकडे सत्ता संपत्ति नाही. जनाबाईचे वडील वारल्यावर त्यांना नामदेवाच्या घरी दासी म्हणून आणलेले. ह्याचाच अर्थ काय तर आपल्याला आपल्या त्या परमेश्वरापुढे कसे उभे राहायचे आहे तर मी काहीच नाही. मी अज्ञानी आहे अडानी आहे. मी शुन्य आहे आणि ह्या शुण्यातून माझा देव मला अंकांमध्ये बदलवतोय. देवाच दासत्व का स्वीकारवे त्याचा गुलाम का होऊ नये? हा प्रश्न इथे आपल्याला पडायला हवाय. गुलाम हा जबरदस्तीने बनवला जातो. आणि दासत्व हे स्वतःहुन स्वीकारल जाते. दासगणू पंढरपुरला जाणार असतात चन्द्रभागेमध्ये स्नान करायला आणि विठ्ठलाचे दर्शन घ्यायला तेव्हा साईनी त्यांना विठ्ठल रुपात दर्शन देऊन आणि पायाच्या  अंगठ्यातून चन्द्रभागेचे पाणी देऊन शिर्डीतच पंढरपुर उभे केले. हे दासत्व कसे हवे आहे तर शरीरात प्राण असेपर्यंत. जो देह त्या ईश्वराने दिलाय त्या देहाला फक्त त्याच्याच कार्यासाठी साधुन घ्या असे हेमाडपंत म्हणतात. 
         दासत्वच का? भक्त का नाही? दास असताना त्याचा सहवास जास्त लाभतो. आपल्याला इथे एक गोष्ट शिकायची आहे ते म्हणजे आपल्या देहाचा आपल्या मनाचा वापर त्याच्यासाठीच झाला पाहिजे. त्याच्या चरणांचे दासत्व स्वीकारून हा संपूर्ण देह त्याच्या कार्यासाठी लावला पाहिजे. शरीरात प्राण असेपर्यंत फक्त तो आणि तोच हा एकच विचार मनी ध्यानी ठसवला पाहिजे. 
            तुझ्या चरणांची धुळ...त्याच्या चरणांत सर्व विश्व सामावलेले आहे. प्रभु रामचंद्राच्या पदस्पर्शाने अहिल्येचा उद्धार केला. श्रीरामानी भरताला चरण पादुका दिल्या आणि सांगितले ह्याला स्पर्श करत जा म्हणजे मला स्पर्श केल्याचा अनुभव येईल. रोहिल्याची कथा ह्या अध्यायात येते. ज्यातून नामस्मरणाचे महत्व स्पष्ट होते. 
 

                  रोहिला कथा 


शिर्डीमध्ये रोहिला नावाचा एक गृहस्थ आला होता. त्याला बाबांच्या प्रेमाने मोह पाड़ला होता. धष्ट -पुष्ट शरीर रचना असलेला रोहिला कोणालाच जुमानात नसे. अगदी साधे राहणीमान असलेला रोहिला शिर्डीत मशिदित येऊन राहिला होता . अंगात कफनी पायघोळ अश्या साध्या पोशाख तो शिर्डीत आला होता. रात्रं-दिवस तो जोर जोरात कुराणातील कमले वाचत असत. कधी मशिदित तर कधी चावडीत बसून तो जोर जोरात वाचन करत असे. दिवस रात्र उन्हातान्हात शेतात खपणारया लोकांना रोहिल्याच्या आवाजाने शांत झोप येत नसे. सर्वच जान रोहिलाला फार कंटाळले होते.बाबा प्रेमळ आहेत कण्वाळु आहेत ते रोहिलाला काहीच बोलणार नाही. मध्यरात्रि रोहिल्याच्या आवाजाने ग्रामस्थांची झोप मोडायची. बाबाना रोहिल्याच्या आवाजाचा कंटाळा येत नसे;पण त्याच्या आवाजाने बाकि सर्वाना खुप त्रास होत असे. 
          रोहिला माथेफिरू होता;आणि बाबांचा तो जवळचा होता. बाबांच्या प्रेमाने त्याला अजुनच ताकद मिळाली होती गावातल्या लोकाना विरोध करायची. तो बेफानपणे त्याला विरोध करणाऱ्याना उलट उत्तरे देत असे. त्यांच्या सोबत दोन-चार हाथ करत असे.अन्यायाच्या विरोधात लढण्याचा विश्वास त्याच्यामध्ये बाबानमुळेच आला होता. त्याच्या अश्या वागण्यामुळे गावही आता त्याच्या विरोधात जाऊ लागला होता. गावातल्या सर्वानी बाबांकडे रोहिल्याविरोधात तक्रार केली पण ती माउलीच काय जी आपल्या बाळाच्या विरोधात उभी राहिल.त्या कण्वाळु माऊलिने रोहिलाला पाठीशी घालत ग्रामस्थांनाच विरोध केला. तुम्ही रोहिलाला सतउ नका. तुमच्या विरोधामुळे त्याच्या पठणात व्यथा येतेय त्याला त्रास देऊ नका. त्या रोहिल्याची बायको त्याच्या सोबत नांदत नाही ती माझ्याकडे त्याला येऊ देत नाही. जर तो ओरडायचा थांबला तर ती त्याला त्रास द्यायला लागते. ती दुर्बुद्धि स्त्री ह्याचा आवाज ऐकुन पळून जाते. आणि जेव्हा ती दुर्बुद्धि विनाशकारी स्त्री पळून जाते तेव्हा मला सर्वात जास्त सुखसमृद्धि लाभते. त्याच्या वाटेला कोण्हीही जाऊ नका. त्याला जितके ओरडायचे तितके ओरडू दया. त्याच्या ओरडण्यामुळे मला शांति भेटतेय. 
     तो जितका ओरडेल तितका त्याला ओरडू दया तो ओरडेल आणि मग थकला की शांत बसेल. बाबानी रोहिलाला पाठिंबा दिलेला पाहून गावातल्यांचा आता नाविलाज झाला. फाल्गुन महिन्यात देखील रोहिला असेच जोर जोरात कमले वाचत असे ते पाहून सर्वाना आश्चर्य होत असे ह्याच्या घशाला कोरड कशी पडत नाही ह्याला ओरडण्याने त्रास नसेल का होत. बाबा किती दयाळू आहेत. खर तर ही सर्व बाबांचीच लीला होती झोप प्रिय असणाऱ्या सर्वाना त्या भगवंताच्या नामाशी जोडायचे होते.
           रोहिल्याची बायको नव्हती बाबांनी ती कथा त्यांच्या बाळांच्या वाईट सवयींसाठी बनवली होती. "रोहिल्याची बाईल घरघुशी "म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये आणि मनामध्ये वाईट व चुकीच्या संकल्पना प्रवेश करायला वेळ लागत नाही त्या वाईट सवयीना, विचारांना बाबांनी घरघुशी म्हटले आहे. परिस्थिति कशी ही असू दे विरोधक कितीही असू दे आपण आपले नामस्मरणाचे काम कधीच सोडायचे नाही. रोहिला जोर जोरात पठन करत असल्यामुळे त्या भगवंताचे नाव सर्वांच्या कानात घुमत असे आणि म्हणूनच त्याच्या ह्या ओरडण्याला बाबांनी कधीच विरोध केला नाही उलट ते गोड़ मानून घेतले म्हणजे त्या ईश्वराला कोणत्याही आवाजात केलेले पठन मान्य असते. बाबांनी सांगितलेल्या कथाप्रमाणे रोहिला जेव्हा जेव्हा जोरात कुरान वाचत असे तेव्हा त्याची बायको त्याच्या जवळपास येत नसे म्हणजेच काय तर त्या त्रिपुरारीचे नाव घेतल्यावर कितीही मोठे संकट असू दया कितीही वाईट गोष्ट असू दया किंवा मायाजाळ असू दया त्याची झळ आपल्याला लागणार नाही, आणि विपदा जवळ न आल्यामुळे आपण आनंदीच राहु. रोहिला पठन करताना त्याला अडवनारे बरेच जन यायचे पण रोहिल्याने त्यांच्याकड़े लक्ष दिल नाही याचाच अर्थ चांगल्या कामात अनेक अडथळे येतात त्यांना सामोरे जाऊन आपण आपल काम नेटाने चालूच ठेवायच.
        हेतु एकच नामस्मरण करने. ज्या नामस्मरणाने वाल्मीकीचा उद्धार झाला. भक्त प्रल्हादासाठी नरसिंह रूप अवतरला गेला. जनाईच  संत जनाबाईत रूपांतर झाल त्या नामस्मरणात किती ताकद असेल हे आपल्याला कळतेच.
       ह्या अध्यायात ओवी क्रमांक 143-148 महत्वाच्या आहेत. 

तुम्ही कुठेही रहा, काहीपन करा मला त्या खबरा नाही सांगितल्या तरी चालतील कारण त्या मला तुम्ही सांगायच्या आधीच कळतात कारण मी तुमच्या सर्वांच्या आतच बसलेलो आहे. तुमच्या हृदयात आहे. माझे येणे किंवा जाणे हे होतच नाही मी तुमच्या मनातच आहे. मी सकळ जणांचा स्वामी आहे कारण मी प्रत्येक गोष्टींमध्ये आहे. मी चराचरात आहे. हे सर्व ईश्वरी आहे आणि त्याचा सूत्रधार मी आहे. मी तिन्ही लोकांत सर्वत्र आहे. मी त्रिगुणांची साम्यावस्था आहे. त्रिगुण म्हणजे तीन गुण रम सत्व आणि तम. मोक्ष किंवा मुक्ती मिळवण्यासाठी या तीन गुणांच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे. ह्या तिन्ही गुणांतील एकहि गुण जर जास्त कमी झाला तर त्याचा मानवी देहावर मनावर परिणाम होतो. अशा त्रिगुणांची एकरूपता ठेवणाराही मीच आहे. जो माझ्याकडे लक्ष लावतो म्हणजे जो माझ्या नामस्मरणात रंगतो त्याची संकटे मी दूर करतो आणि ज्याला माझा विसर पडतो तो माझ्या मायेच्या वाचून कोरडाच राहतो. किड, मुंगी सर्वांच दर्शनीय रूप मी आहे. मी सूक्ष्माणपासून सुक्ष्म घटकांमध्ये देखील वसतो. हेमाडपंत ह्या अध्यायात म्हणतात बाबा औषध ही गुळाच्या रुपात पाजवतात. कामावरून निवृत झालेल्या हेमाडपंतांना आता नवीन कामाची गरज होती ती त्यांनी साईंना सांगितली त्यावर साईं बोलले मी दूसरी नोकरी तोपर्यंत माझी सेवा कर. साईंच्या एका वाक्यावर विश्वास ठेऊन हेमाडपंत निश्चिंत झाले म्हणजेच काय तर त्याच्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवावा. कसलीच शंका मनात आनु नये. त्याचा शब्द तो पूर्ण करणारच. 
हरी ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध 
भक्ती पालांडे 



Comments

Popular posts from this blog

अध्याय दुसऱा सारांश