सौंदर्याची परिसीमा तू....


खड्कातुन खळ खळ करत वाहनारे पाणी जितके निर्मळ असते तसे तुझे सौंदर्य आहे. तुझे सौंदर्य इतके अप्रतिम आहे की लहानच काय पण मोठयांना ही ते भूल पाडते. सौंदर्य म्हणजे नुसते बाह्य रूप नाही तर मनातील विचार, त्या विचारांचा सखोलपणा, सर्वाना स्वत: मध्ये सामावुन घ्यायची भावना, प्रेम करुणा...... तुझ्या एका हसन्यातच मी माझे सारे दुःख विसरुन जाते. ज्यावेळेस माझ्यात अहंकार, गर्व,  मीपणा, राग, द्वेष ह्या सर्व वाईट व चुकीच्या भावना होत्या, परकेच काय पण आपले सुद्धा जेव्हा मला विचारत नव्हते त्या वेळेस तू मला तुझ्या ह्या गोड़ हास्याने जवळ केलस. मी निस्सार असताना ही तू मला अपनवलेस. मला तू तुझ्या सौंदर्याचे वेड लावलस. तुझ्या मध्ये असलेल्या एका लडिवाळ वडिलांच्या भावनेने मला जवळ घेतलस. अगदी तसच जस हेमाडपंतांना साईंनी जवळ घेतल होत. साईं आणि हेमाडपंत ह्याची पहिली धुळभेट आठवली की मला आपली आठवण येते. साईंचे सौंदर्य त्यांच्या डोळ्यातील कारुन्य निर्गुणाला सगुणात बदलवतो. आपली बदलायची तयारी असली तर तो आपल्याला जवळ घेणारच आहे.

Comments

Popular posts from this blog

अध्याय दुसऱा सारांश