अध्याय दूसरा -भाग दोन. हेमाडपंत शिर्डीगावी कसे आले?



*हेमाडपंत शिर्डीगावी कसे आले?*
           काकासाहेब दीक्षित हेमाडपंतांना भेटतात ते हेमाडपंतांना शिर्डीगावतील साईंचा महिमा सांगतात. त्यांच्याकडून शिर्डीला यायचा वचन घेतात हेमाडपंत जान्यास तयार होतात पण त्याचवेळेस त्यांच्या मित्राच्या मुलाचा मृत्यु होतो. त्यांचा मित्र हा निससीम गुरु भक्त असतो. त्याच्या मुलाच्या आजारपणात तो खुप उपासतपास करतो. मुलाला बर वाटाव म्हणून तो त्याच्या मुलाला त्याच्या गुरुच्या बाजूलाही ठेवतो. पण सर्व करुनही त्याच्या मुलाचा मृत्यु होतो.आणि ही सर्व परिस्थिति पाहुण हेमाडपंत शिर्डीला जान्याचे टाळतात.
             नंतर काही दिवसांनी नानासाहेब चांदोरकर हेमाडपंतांना भेटतात ते देखील शिर्डीतील साईंचा महिमा हेमाडपंताना सांगतात. हेमाडपंत त्वरित शिर्डीत जान्यास निघतात. ते बांद्राहुन दादरला जाऊन मनमाड़ची ट्रेन पकड़नार असतात पण इतक्या चालत्या गाडीत एक गृहस्थ चढ़तो आणि त्यांना बोरीबंदरला जा असे सांगतो. त्या व्यक्तिवर विश्वास ठेउन हेमाडपंत बोरीबंदरहुन शिर्डीस जातात.
             इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ते म्हणजे काकासाहेब आणि नानासाहेब ह्या दोघांनी ही हेमाडपंताना साईं महिमा सांगितला म्हणजेच काय तर साईंच अनुभव संकीर्तन केले एका सद्गुरुविन भक्ताला भक्तीचा मार्ग दाखवला. तसेच एका परक्या व्यक्तिवर विश्वास ठेऊन हेमाडपंत त्या मार्गावर जातात म्हणजे त्यांना इथे विश्वास पटतो की ते चुकीच्या मार्गावर जाऊ शकत नाही. जिथे साईंचरणी विश्वास ठेवला तिथे मार्ग चुकुच शकत नाही.

Comments