अध्याय पहिला
अध्यायात "अथ "हा शब्द वापरला आहे. हा शब्द कोणतेही चांगले काम करण्याआधी वापरला जातो. साईं सत्चरित्र वाचने ह्या हुन अधिक चांगले काम कोणतेच नाही.
प्रत्येक मानवाला त्याच्या कर्तव्याची ओळख करुन देण्यासाठी हा अध्याय साईंसत्चरित्रात श्री हेमाडपंतानी पहिला घेतला असावा.
हेमाडपंत सर्व रूपांमध्ये साईं बाबांनाच पाहतात
गुरुसंसगति गंगाजळ |क्षाळीते मळ करीते निर्मळ |
मनासम दूजे काय चंचळ |करिते निश्चळ हरीचरणी ||60
समर्थ रामदास स्वामी छत्रपति शिवाजी महाराज ह्यांचे गुरु होते. वरील ओवी गुरुचे महत्व स्पष्ट करते. गुरुच्या सोबत जेव्हा आपण असतो तेव्हा त्या वातवरणात गंगजलासारखी पवित्रता असते. सकारात्मक दृष्टिकोण आणि उचित विचार तसेच गुरुकड़े असणाऱ्या अगाध ज्ञानामुळे मानवी मनातील वाईट विचार नकारात्मक दृष्टिकोण ह्याचा हळू हळू नाश होत जातो. गुरु हे एकमेव
असे व्यक्तिमत्व आहे जे सतत त्यांच्या शिष्याना काही ना काही योग्य तेच देत असतो. त्यांच्या शिष्यांपासून अयोग्य ते वंचित राहत.
मानवी शरीरात मन हे सर्वात चंचल असते. जे समोर घडते त्याचा मागोवा घेत असते. एखाद्या गोष्टीचा पाठलाग करताना चांगले किंवा वाईट ह्या सर्वांचा ते विचार करत नाही. ज्या व्यक्तीचा त्याच्या मनावर ताबा असेल तीला संत असे म्हटले जाते.या भारत भुमी ला संतांची पार्श्वभूमि लाभली आहे.मन चंचल म्हणजे नक्की काय?
जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर नीट एकाग्र (concentration )करू शकत नाही.आपले मन जेव्हा एखाद्या गोष्टीचा चांगला वाईट विचार न करता त्या गोष्टीला अथवा व्यक्तीला अपनवतो तेव्हा मनाच्या अशा स्थितिला आपण चंचल मन म्हणतो. ह्या अशा मनाची मलिनता दूर करण्याचे काम गुरु करतो. त्या हरी चरणांशी मन शांत होते. आपल्या हरिच्या चरणांचे नीट निरिक्षण म्हणजे फक्त हरीचा ध्यास ध्यानी मनी ठेवला तर हे मन आपोआप शांत होते.
चाळल्या काय कुठे नेता |बापाचा माल घेऊनि जाता |
बाबानी हे शब्द महामारी ला वापरले आहेत. ती महामारी जी गावातल्या लोकांचा जीव घेण्यासाठी गावात शिरली होती. माझी बाळ म्हणजे तुमच्या बापाचा माल नाही जे तुम्ही गावात येऊन त्याना घेऊन जात आहात अशा खनखनित शब्दात बाबानी त्या महामारीला हीनवले.
आल्या रांडा फुकट खाऊ |लुटाया मज धावधावू |
गहु माझे काय कर्जाऊ |पीठ नेउ पाहता ||130||
इथे ह्या ओवीमधे बाबानी बायकांच्या मनातील स्वार्थी व कपट भावनेला शिव्या देऊन त्यांच्या मनातून निघून जान्यासाठी सांगितले होते. पण जर आपण ह्या ओवीचा अजुन नीट विचार केला तर आपल्याला कळते की, बाबानची श्रीमंती ही त्यांची बाळे आहेत. बाबानी जे अपशब्द वापरले ते त्या प्लेगच्या रोगराईला.
जात्याचा खूंटा हा विश्वासरूपी आहे. जात्याचा वरचा भाग हा सेवा दर्शवतो त्यात सद्गुरु आपले प्रारब्ध भरडतो तर जात्याचा खालचा भाग जीतुन पीठ बाहेर येते ते भक्ती आणि सेवा ह्यांचे उत्तम मिश्रण आणि चविला रुचकर असे आपल्या सद्गुरुचे प्रेम आहे. जात्याच्या खूंटा, त्याचा वरचा भाग आणि खालचा भाग ही त्रिविक्रमाची तीन पावले आहेत.


Comments
Post a Comment