थकले रे बापू ओढ़ता संसार आता दे विश्रांति तुझ्या पायी..




जन्ममृत्युचे जाळे कोणालाही चुकले नाही. संसाराचा गाडा प्रत्येकाला खेचावाच लागतो. कधी सुख तर कधी दुख सोसत अनेक अडचणींना सामोरे जात जीवन जगणे चालूच असते. दैनंदिन काम करता करता कधी कधी अस वाटत, बस आता पुरे झाले... आता अजुन पुढे नाही होत आहे. दररोज सकाळी लवकर उठून सकाळच्या न्ह्यारी पासून ते रात्रीच्या अंथरुण घालण्यापर्यंत सर्वच काम करता करता शरीरात जणू प्राण उरतच नाही. 
      कधी कधी झोपेत पण माझी चपाती करपते की काय?दूध उतुन जातय.. घराला नीट कुलुप लावला असेल ना? आणि लाइट्स फैन बंद असतील ना... गैस बंद केला ना? अशी स्वप्न देखील पडतात. दिवस रात्र मेहनत करुन सुद्धा कधी कधी अस वाटत कुठे तरी आपण कमीच पडतो. कधी घरच्यांच्या मागण्या पुरवतना तर कधी ऑफिसची कामे करताना. बापू सर्वाना फक्त स्वतःच पडलेल असत."स्व" पना माणसात इतका भिनला आहे की दुसऱ्याबदल विचार करायला फार कमी वेळ मिळतो. अशा वेळेस बापू शरीराने तर आहेच पण मनाने देखील खुप थकल्यासारखा होत. आणि या थकलेल्या मनाला आणि शरीराला फक्त तुझ्या चरणांशीच विश्रांति मिळते. 
          थकले रे बापू ओढ़ता संसार 
          आता दे विश्रांति तुझ्या पायी 
          कितीपण थकवा असू दे मन एकदम कमकुवत झालेल असल तरीसुद्धा ते तुमच्या चरणदर्शनाने शांत होत. सद्गुरु चरणी मन समर्पित केले तर त्यातून मिळणारा आंनद अगणित असतो. बापू खर सांगू तर हा थकवा मला हवा हवासा वाटतो कारण ह्याच थकव्यामुळे मी तुझ्या चरणाच्या खुप जवळ येते. तुझ्या चरणांनिकट राहते. जर माझा थकवा माझे प्रारब्ध असेल ना तर मी खरच खुप अंबज्ञ आहे असे प्रारब्ध मला मिळाले जे मला माझ्या सद्गुरु चरणांजवळ नेत आहेत. सुखात तर सद्गुरु आठवतो पण दुखःत तो सर्वात जास्त जवळचा वाटतो. त्यामुळे बापू त्या दुःखना पण मी अंबज्ञ म्हणेल ज्याने मला तुझ्या चरणांजवळ आणल.जे मन तुझ्या चरणांशी अर्पण केलय त्या मनात कसलीच शंका -कुशंका राहत नाही. बापू तुम्ही आम्हाला तुमच्याच चरणांशी ठेवा. वरदहस्त दिलाच आहे आता चरणस्पर्श आणि त्या चरणांची धुळ चाखायला दया. तुमच्या चरणांशीच ठेवा हीच एक इच्छा. 
      हरी ॐ, श्रीराम अंबज्ञ नाथसंविध 
       भक्ती पालांडे 
     

Comments

Popular posts from this blog

अध्याय दुसऱा सारांश