अध्याय दूसरा -भाग चौथा
ऐसी मनात उदेली वृती | माधवरावांचे कानावरती
घातली परी साशंक चित्ति | कैसे मजप्रति साधे है | |48||
वरील ओवी वरुण एक गोष्ट स्पष्ट होते. हेमाडपंतानच्या मनात साईंविषयी कथा लिहण्याची इच्छा उत्पन्न होते. पण बाबांशी बोलण्याचा त्यांचा धीरच होत नाही. म्हणून त्यानी माधवरावाना बाबांची अनुमति घ्यायला सांगितली. पण त्या आधीच बाबाना सर्व कळले होते. बाळाच्या मनात काय चालले आहे तो कोणत्या व्यवस्थेत अडकला आहे हे गुरुला सांगण्या आधीच तो ओळखतो.
आलेची बाबा मंडळीनिशि | वाडियाचे कोपयर्रहपाशी |
चला आधी धुळभेटिसी | मग ते लेंडीसी निघतील ||135||
○ हेमाडपंत गाडीतून उतरल्यावर लगेचच त्यांना हा निरोप भेटतो. हेमाडपंताना भेटण्यासाठी स्वतः साईं अर्ध्या वाटेपर्यंत चालून आले होते. भक्तांइतकीच आतुरता देवालाही असते म्हणून तर पंढरीचा विठूराया त्याच्या भक्तांची वाट बघत कंबरेवर हाथ ठेऊन विटेवर उभा आहे.
○ " चला आधी धुळभेटीसी " ह्याचा अर्थ बाबाना भेटण्यासाठी आणि त्यांच्या चरणांचे दर्शन घेण्यासाठी. पण हे चरण दर्शन फक्त नमस्कार करुन नाही तर पूर्णः त्याला शरण जाऊन आणि तेहि त्याला लोटांगण घालून. ओवी क्रमांक 135 आहे. 1+3+5=9 याचाच अर्थ नाथसंविध. गुरु चरणांशी सर्व आयुष्य समर्पित केल्यावर त्याचे नाथसंविध होणारच. साईं दर्शन घेतल्यावर हेमाडपंताना नवीन आयुष्य मिळाल्यासारखे वाटत होते जे ऐकले होते त्यापेक्षाही प्रत्यक्षात साईंचे रूप खूपच तेजस्वी आणि अद्भुत होते. तो एकमेव आपला उद्धार करू शकतो.
वाड्यापासूनि मशीदीपर्यंत |मध्यंतरी अंतर बहुत |
बाबांसी कळले कैसे हे वृतत|आश्चर्यचकित मी मनी||167||
वाड्यापासून मशीदीपर्यंत अंतर खुप होते. तरी वाड्यात झालेले भांडण बाबांना कसे कळले? इथे हेमाडपंताना बाबा खुप गोड़ अनुभव देतात. भक्त लांब असू दे किंवा जवळ असू दे त्या भक्ताच्या वेदना त्याचा त्रास सुख दुख शंका सर्वच त्याला कळतात. अंतर हे फक्त प्रमाण झाले खरा तर आपल्या भक्तासोबत पुढे काय काय होणार आहे हे सर्व सद्गुरुला आधीच माहित असते. प्रारब्धाच्या घड्या उघडून त्याला योग्य वाटेवर आणायचे काम गुरुशिवाय कोणाला उत्तम जमणार.

Comments
Post a Comment