धावून धावून थकलो असता हाचि घरी आला
प्रयत्न काय असतो ❓️धडपड काय असते ❓️कठिन काळ वाईट परिस्थिति.. ही सर्व तू भेटण्याआधीची स्थिति होती. म्हणून तर पीपा म्हणतात.. भावला अनिरुद्ध मजला धावून धावून थकलो असता हाचि घरी आला बाबा तू घरी आलास आणि माझा वाईट काळ जसा काही तोंड घेऊन निघून गेला. मी काहीच केला नाही फक्त एकदा तुझ नाव घेतल. आणि माझ्या एका सेकंदाच्या विश्वासापोटी तू माझ्यासाठी धावतच आलास. माझ्या घरपर्यंत आलास. हाचि घरी आला म्हणजे काय ❓️माझ्या सोबत माझ्या घरच्यांची काळजी घ्यायला हा घरपर्यंत आला. भावला :भाव +आला =माझ्या भोळ्या भावाला भूलून तो आला. पण बाबा मी खुप स्वार्थी आहे. जेव्हा माझा काम अडुन राहत तेव्हा तेव्हा मी तुला आवाज देतो. पण तू मात्र किती रे भोळा... माझ्या एका सादेला पण तू लगेच धाऊन येतोस. प्रसंगी हाचि रे उभा ठाकतो हाथ पसरूनी जवळी घेतो निर्णय आमुचे चुकले असता, हाचि मध्ये आला ||1|| अड़-अडचणीच्या काळात नातेवाईक, शेजारी मित्र इतकेच काय तर कुटुंबीय सुद्धा माझ्या सोबत नसतात. पण dad तू मात्र खूपच वेगळा आहेस. कितीही बिकट परिस्थिति असली तरीही मा...