Posts

स्वयं भगवान त्रिविक्रम

Image
 

धावून धावून थकलो असता हाचि घरी आला

Image
  प्रयत्न काय असतो ❓️धडपड काय असते ❓️कठिन काळ वाईट परिस्थिति.. ही सर्व तू भेटण्याआधीची स्थिति होती. म्हणून तर पीपा म्हणतात..  भावला अनिरुद्ध मजला  धावून धावून थकलो असता हाचि घरी आला   बाबा तू घरी आलास आणि माझा वाईट काळ जसा काही तोंड घेऊन निघून गेला. मी काहीच केला नाही फक्त एकदा तुझ नाव घेतल. आणि माझ्या एका सेकंदाच्या विश्वासापोटी तू माझ्यासाठी धावतच आलास. माझ्या घरपर्यंत आलास.  हाचि घरी आला  म्हणजे काय ❓️माझ्या सोबत माझ्या घरच्यांची काळजी घ्यायला हा घरपर्यंत आला.  भावला :भाव +आला =माझ्या भोळ्या भावाला भूलून तो आला. पण बाबा मी खुप स्वार्थी आहे. जेव्हा माझा काम अडुन राहत तेव्हा तेव्हा मी तुला आवाज देतो. पण तू मात्र किती रे भोळा... माझ्या एका सादेला पण तू लगेच धाऊन येतोस.  प्रसंगी हाचि रे उभा ठाकतो  हाथ पसरूनी जवळी घेतो  निर्णय आमुचे चुकले असता, हाचि मध्ये आला ||1||     अड़-अडचणीच्या काळात नातेवाईक, शेजारी मित्र इतकेच काय तर कुटुंबीय सुद्धा माझ्या सोबत नसतात. पण dad तू मात्र खूपच वेगळा आहेस. कितीही बिकट परिस्थिति असली तरीही माझ्या सोबत असतोस. कसलाही विचार न करतात माझ्या प्रत्येक संकटात तू

अध्याय चौथा

Image
  हा अध्याय म्हणजे साक्षात साईंचे विठ्ठल रुपात दर्शन घेणे. ह्या अध्यायामध्ये 3 गोष्टी आल्या आहेत  चला मग गोष्टींसोबत बाबांचे प्रेम अनुभवूया.  साईंबाबा माहिती अध्याय चौथा  16 वर्षांचे असताना  साईं निंबातळी शिर्डी गावात प्रथम प्रकटले. त्यांचे आई वडील कोण ❓️ते कुठे राहतात ❓️त्यांचा जन्म कुठे झाला ❓️हे कोणालाच माहित नाही. स्वतच सर्व सोडून बाबा शिर्डीत आले.     नाना चौपदारांच्या आईने कथा सांगितले. कोवळ्या वयात ह्याने जप तप केले. लहान वयात हा एकटा रहायचा ह्याला दिवसा कोणाची संगती न्हवती रात्री कोणाची सोबत न्हवती. मनात कसलीच भीति न्हवती. कधी कोणाच्या दारी गेले नाही. सतत लिंबाच्या झाड़ाशेजारी बसलेले असायचे. त्या बाळकांविषयी सर्वांनाच जाणून घ्यायची फार इच्छा होती. पण बाबांबद्दल कोणाला काहीच कळत न्हवत. एक दिवस दोन -चार जणांच्या अंगात खण्डोबाचे वारे आले. लोकानी त्यांना प्रश्न विचारण्यास सुरवात केली. काहिनी त्या 16 वर्षाच्या त्या मुलाबदल प्रश्न विचारण्यास सुरवात केली. तेव्हा अंगात आलेल्या त्या चौघांपैकी एकाने सांगितले, मी दाखवतो त्या जगी खना तेथेच तुम्हाला ह्या मुलाबदल माहिती मिळेल. गावकऱ्यांनी लगे

अध्याय तिसरा सारांश

Image
अध्याय तिसरा अतिशय महत्वाचा आहे हयात बाबांच्या मुखीची काही वाक्ये आणि त्यांची वचने ह्यांचा समावेश आहे. नामस्मरणाचे महत्त्व आणि बाबांच्या जवळ जाण्यासाठी हा अध्याय अतिशय उपयुक्त आहे.        नामस्मरणाचे महत्व  नाम संकीर्तन साध पै सोपे | जळतील पापे जन्मांतरीचि ||1||        तुकाराम महाराज ह्या अभंगात नामस्मरणाचे महत्व सांगतात. नामस्मरण हे सर्वात सोपे साधन आहे जन्मांतरीचि पापे धुवायला. नामस्मरणाने पापे फक्त धुउन नाही तर जळून जातात म्हणजेच काय तर समूळ नष्ट होतात.    नाम नारायण अंती उद्धारक |नामा म्हणे देख भाक माझी || संत नामदेवाच्या अभंगात त्यांनी नामाचे महत्व विशद केले आहे.  भगवंताच्या नामानेच उद्धार होणार आहे. त्याचा फक्त अंश देखील माझा उद्धार करणार आहे. संतांनी नामस्मरणाचे महत्व वेळोवेळी मांडलेच आहे.       नामस्मरण हे असे बीज आहे जे उजाड जमिनीवरही ओलावा आणून त्यात बी सहज़ पेरले जाईल. त्या" बी " ला अंकुर फुटुन त्याचा सतत फुलनारे रोपटे येते. ह्या रोपट्याला खत पाणी मिळत ते सेवा आणि भक्तीच. नामस्मरणाचे बी पेरणारे आपण असतो पण त्याला सेवा आणि भक्तीचे खत पाणी देण्याचे काम त्याची उन-पाऊस,

कानी आले शब्द माझ्या सद्गुरुरायाचे | अन धाव घेई मन झाले वेडेपिसे ||धृ ||

Image
कानी आले शब्द माझ्या सद्गुरुरायाचे | अन धाव घेई मन झाले वेडेपिसे ||धृ ||  चिव चिव असा चिऊताईचा आवाज जेव्हा सकाळी सकाळी कानावर पडतो तेव्हा अस वाटत माझा त्रिविक्रम बाप्पा मला उठवण्यासाठी आलाय. त्या चिऊताईच्या आवाजातुन बापुराया तुझ पितृवचन आठवते. Dad तुमचा आवाज कानी पडताच हरिगुरुग्रामची आठवण येते. डोळ्यातून पाण्याची धार लागते. बापू "सत्याला मरण नाही "असच विचार करुन तुझी बाळ त्याच वाटेवर जातात पण बाबा तरीही ठोकर लागते. बाबा कितीही कुणाशीही चांगले वागले तरीही ठेच लागून ढोपरं फुटतातच. रक्त येत जखमा होतात. बाबा जखमा शरीरावर होतात पण घाव मात्र मनावर उमटतात आणि त्यावेळी बाबा तुझा शब्दन शब्द आठवतो ते सर्व आठवून मन तुझ्याकडे धाव घेत. तुझ्या शब्दांसाठी मन वेडेपिसे होते. तुला पाहण्यासाठी डोळे भरून येतात. कोरन्टाइनच्या शेवटच्या चार महिन्यात मनाची अवस्था तुझ्या आठवणीने हळवी झाली आहे. Dad डिजिटल उपासनेतून तुझे शब्द जेव्हा कानावर येतात तेव्हा अस वाटत धावत -पळत तुझ्या समोर यावे आणि तुझ्या काठीची जागा घ्यावी जेणेकरून तुझा हाथ माझ्या डोक्यावरच राहील. जिथे तू तेथे मी. नजरेसमोरून दूरच नाही होऊं दे

अध्याय तिसरा -भाग दोन -रोहिला कथा

Image
                    रोहिला कथा  शिर्डीमध्ये रोहिला नावाचा एक गृहस्थ आला होता. त्याला बाबांच्या प्रेमाने मोह पाड़ला होता. धष्ट -पुष्ट शरीर रचना असलेला रोहिला कोणालाच जुमानात नसे. अगदी साधे राहणीमान असलेला रोहिला शिर्डीत मशिदित येऊन राहिला होता . अंगात कफनी पायघोळ अश्या साध्या पोशाख तो शिर्डीत आला होता. रात्रं-दिवस तो जोर जोरात कुराणातील कमले वाचत असत. कधी मशिदित तर कधी चावडीत बसून तो जोर जोरात वाचन करत असे. दिवस रात्र उन्हातान्हात शेतात खपणारया लोकांना रोहिल्याच्या आवाजाने शांत झोप येत नसे. सर्वच जान रोहिलाला फार कंटाळले होते.बाबा प्रेमळ आहेत कण्वाळु आहेत ते रोहिलाला काहीच बोलणार नाही. मध्यरात्रि रोहिल्याच्या आवाजाने ग्रामस्थांची झोप मोडायची. बाबाना रोहिल्याच्या आवाजाचा कंटाळा येत नसे;पण त्याच्या आवाजाने बाकि सर्वाना खुप त्रास होत असे.            रोहिला माथेफिरू होता;आणि बाबांचा तो जवळचा होता. बाबांच्या प्रेमाने त्याला अजुनच ताकद मिळाली होती गावातल्या लोकाना विरोध करायची. तो बेफानपणे त्याला विरोध करणाऱ्याना उलट उत्तरे देत असे. त्यांच्या सोबत दोन-चार हाथ करत असे.अन्यायाच्या विरोधात लढण्या

अध्याय तिसरा -भाग एक नामस्मरणाचे महत्व

Image
नामस्मरणाचे महत्व  नाम संकीर्तन साध पै सोपे | जळतील पापे जन्मांतरीचि ||1||        तुकाराम महाराज ह्या अभंगात नामस्मरणाचे महत्व सांगतात. नामस्मरण हे सर्वात सोपे साधन आहे जन्मांतरीचि पापे धुवायला. नामस्मरणाने पापे फक्त धुउन नाही तर जळून जातात म्हणजेच काय तर समूळ नष्ट होतात.   नाम नारायण अंती उद्धारक |नामा म्हणे देख भाक माझी || संत नामदेवाच्या अभंगात त्यांनी नामाचे महत्व विशद केले आहे.  भगवंताच्या नामानेच उद्धार होणार आहे. त्याचा फक्त अंश देखील माझा उद्धार करणार आहे. संतांनी नामस्मरणाचे महत्व वेळोवेळी मांडलेच आहे.       नामस्मरण हे असे बीज आहे जे उजाड जमिनीवरही ओलावा आणून त्यात बी सहज़ पेरले जाईल. त्या" बी " ला अंकुर फुटुन त्याचा सतत फुलनारे रोपटे येते. ह्या रोपट्याला खत पाणी मिळत ते सेवा आणि भक्तीच. नामस्मरणाचे बी पेरणारे आपण असतो पण त्याला सेवा आणि भक्तीचे खत पाणी देण्याचे काम त्याची उन-पाऊस, वादळ -वारा, पुर -दुष्काळ ह्या सर्वांपासून योग्य काळजी घेण्याचे काम सद्गुरु करतो.आपण एक पाऊल टाकल की तो उरलेली 107 पाउल आपल्यासाठी टाकतोच.          सत्ययुगात ध्यान करुन भगवंताला प्रसन्न केल

एकवेळ तू सहजचि ये रे, अनिरुद्ध मम घरी | आगमनाची वाट पाहतो, दे मज तुचि सबूरी ||

Image
पी -पी पियु, पी -पी  पियु असा खणखणीत आवाज काढणारा चातक पक्षी जसे पावसाच्या एका थेंबाची वाट पाहतो. शेतकरी त्याच्या शेतातील धन -धान्याची वाट पाहतो. खेळाडू टूर्नामेंटची कलाकार त्याच्या कलेला कसा वाव मिळेल ह्याची वाट पाहतो. माणूस सुखाची वाट पाहतो. भोळे भाविक गणरायाची नवरात्रिची वाट पाहतात. तसेच बापू आम्ही तुझी वाट पाहतो. ही वाट पाहता पाहता न कळत मुखातून येते...            एकवेळ तू सहजचि ये रे, अनिरुद्ध मम घरी |            आगमनाची वाट पाहतो, दे मज तुचि सबूरी ||         हे सद्गुरुराया तुम्ही माझ्या घरी कधी येणार. तुमच्या आगमनाची मी आतुरतेने वाट पाहतेय. शबरीने जशी श्रीरामाची वाट पाहिली होती तशीच मी तुझी वाट पाहतेय. दारासमोर रांगोळ्याची रास घातली आहे. फुलांच्या माळा तयार आहेत. गोडीचे आप्पे तयार आहेत. तुम्हाला आवडते ते केसर पाणी पण तयार आहे. जेवनाचाही घाट घातला आहे. आता फक्त तुम्ही या. माते शबरी सारखी आणि बंधु भरतसारखी सबूरी आमच्यात उरली नाही. तुमच्या श्रीचरणांचे दर्शन घ्यायला मन आतुर झालाय.तुमची सेवा करायला उर भरून आलय. साध्य आणि सिद्धता आता तुम्हीच पूर्ण करा.आमच्या मनाता आता सबूरी तुम्ही निर्

अध्याय दुसऱा सारांश

Image
         काकासाहेब दीक्षित हेमाडपंतांना भेटतात ते हेमाडपंतांना शिर्डीगावतील साईंचा महिमा सांगतात. त्यांच्याकडून शिर्डीला यायचा वचन घेतात हेमाडपंत जान्यास तयार होतात पण त्याचवेळेस त्यांच्या मित्राच्या मुलाचा मृत्यु होतो. त्यांचा मित्र हा निससीम गुरु भक्त असतो. त्याच्या मुलाच्या आजारपणात तो खुप उपासतपास करतो. मुलाला बर वाटाव म्हणून तो त्याच्या मुलाला त्याच्या गुरुच्या बाजूलाही ठेवतो. पण सर्व करुनही त्याच्या मुलाचा मृत्यु होतो.आणि ही सर्व परिस्थिति पाहुण हेमाडपंत शिर्डीला जान्याचे टाळतात.              नंतर काही दिवसांनी नानासाहेब चांदोरकर हेमाडपंतांना भेटतात ते देखील शिर्डीतील साईंचा महिमा हेमाडपंताना सांगतात. हेमाडपंत त्वरित शिर्डीत जान्यास निघतात. ते बांद्राहुन दादरला जाऊन मनमाड़ची ट्रेन पकड़नार असतात पण इतक्या चालत्या गाडीत एक गृहस्थ चढ़तो आणि त्यांना बोरीबंदरला जा असे सांगतो. त्या व्यक्तिवर विश्वास ठेउन हेमाडपंत बोरीबंदरहुन शिर्डीस जातात.              इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ते म्हणजे काकासाहेब आणि नानासाहेब ह्या दोघांनी ही हेमाडपंताना साईं महिमा सांगितला म्हणजेच काय तर साईंच