Posts

Showing posts from June, 2020

अध्याय दूसरा -भाग दोन. हेमाडपंत शिर्डीगावी कसे आले?

Image
*हेमाडपंत शिर्डीगावी कसे आले?*             काकासाहेब दीक्षित हेमाडपंतांना भेटतात ते हेमाडपंतांना शिर्डीगावतील साईंचा महिमा सांगतात. त्यांच्याकडून शिर्डीला यायचा वचन घेतात हेमाडपंत जान्यास तयार होतात पण त्याचवेळेस त्यांच्या मित्राच्या मुलाचा मृत्यु होतो. त्यांचा मित्र हा निससीम गुरु भक्त असतो. त्याच्या मुलाच्या आजारपणात तो खुप उपासतपास करतो. मुलाला बर वाटाव म्हणून तो त्याच्या मुलाला त्याच्या गुरुच्या बाजूलाही ठेवतो. पण सर्व करुनही त्याच्या मुलाचा मृत्यु होतो.आणि ही सर्व परिस्थिति पाहुण हेमाडपंत शिर्डीला जान्याचे टाळतात.              नंतर काही दिवसांनी नानासाहेब चांदोरकर हेमाडपंतांना भेटतात ते देखील शिर्डीतील साईंचा महिमा हेमाडपंताना सांगतात. हेमाडपंत त्वरित शिर्डीत जान्यास निघतात. ते बांद्राहुन दादरला जाऊन मनमाड़ची ट्रेन पकड़नार असतात पण इतक्या चालत्या गाडीत एक गृहस्थ चढ़तो आणि त्यांना बोरीबंदरला जा असे सांगतो. त्या व्यक्तिवर विश्वास ठेउन हेमाडपंत बोरीबंदरहुन शिर्डीस जातात.              इथे ए...

सौंदर्याची परिसीमा तू....

Image
खड्कातुन खळ खळ करत वाहनारे पाणी जितके निर्मळ असते तसे तुझे सौंदर्य आहे. तुझे सौंदर्य इतके अप्रतिम आहे की लहानच काय पण मोठयांना ही ते भूल पाडते. सौंदर्य म्हणजे नुसते बाह्य रूप नाही तर मनातील विचार, त्या विचारांचा सखोलपणा, सर्वाना स्वत: मध्ये सामावुन घ्यायची भावना, प्रेम करुणा...... तुझ्या एका हसन्यातच मी माझे सारे दुःख विसरुन जाते. ज्यावेळेस माझ्यात अहंकार, गर्व,  मीपणा, राग, द्वेष ह्या सर्व वाईट व चुकीच्या भावना होत्या, परकेच काय पण आपले सुद्धा जेव्हा मला विचारत नव्हते त्या वेळेस तू मला तुझ्या ह्या गोड़ हास्याने जवळ केलस. मी निस्सार असताना ही तू मला अपनवलेस. मला तू तुझ्या सौंदर्याचे वेड लावलस. तुझ्या मध्ये असलेल्या एका लडिवाळ वडिलांच्या भावनेने मला जवळ घेतलस. अगदी तसच जस हेमाडपंतांना साईंनी जवळ घेतल होत. साईं आणि हेमाडपंत ह्याची पहिली धुळभेट आठवली की मला आपली आठवण येते. साईंचे सौंदर्य त्यांच्या डोळ्यातील कारुन्य निर्गुणाला सगुणात बदलवतो. आपली बदलायची तयारी असली तर तो आपल्याला जवळ घेणारच आहे.

अध्याय दूसरा -भाग एक

Image
गुरु कशाला हवा?? (हेमाडपंतांचे बाळासाहेब भाटयांशी झालेल्या वादातुन मिळालेले उत्तर )                         शिर्डीमध्ये हेमाडपंत आणि बाळासाहेब भाटे ह्यांच्या मध्ये गुरु कशाला हवा? ह्या विषयावार वाद झाला त्या वादातुनच मिळालेल सुंदर उत्तर..     आपण आपल्या विचारांच्या, राग, क्रोध, मत्सर, मोह ह्या सर्वांच्या जाळयात अडकलेले असतो. ह्या भावना किंवा अहंकार, गर्व, माज ह्या सर्वानमध्ये आपण गुंतलेलो असतो म्हणजे आपण ह्याच्या दबावाखाली असतो. पारतंत्र म्हणजे नक्की काय तर एखाद्याच्या दबावाखाली राहने. तो सांगतो तेच एेकणे, करने. गुरु आपल्याला ह्या सर्वातुन दूर करतो. कधी अध्यात्माच्या वाटेवर तर कधी विज्ञानाच्या वाटेवरुन तो त्याच्या बाळाला भक्कम बनवत असतो. मानवी मनावर ताबा करण्यासाठी त्याच्या मनात भीति उत्तपन करने गरजेचे असते अशी भीति दूर करण्याच काम गुरु करतो.             बाळाला योग्य तो मार्ग दाखवन्याच काम फक्त गुरुच करू शकतो . ज्याचे कार्य आहे ते त्यानेच करायला हवे. जर आपण आयत्या गोष्टीची वाट ...

अध्याय पहिला

Image
अध्यायात "अथ "हा शब्द वापरला आहे. हा शब्द कोणतेही चांगले काम करण्याआधी वापरला जातो. साईं सत्चरित्र वाचने ह्या हुन अधिक चांगले काम कोणतेच नाही.  प्रत्येक मानवाला त्याच्या कर्तव्याची ओळख करुन देण्यासाठी हा अध्याय साईंसत्चरित्रात श्री हेमाडपंतानी पहिला घेतला असावा.  हेमाडपंत सर्व रूपांमध्ये साईं बाबांनाच पाहतात गुरुसंसगति गंगाजळ  |क्षाळीते मळ करीते निर्मळ | मनासम दूजे काय चंचळ |करिते निश्चळ हरीचरणी ||60 समर्थ रामदास स्वामी छत्रपति शिवाजी महाराज ह्यांचे गुरु होते. वरील ओवी गुरुचे महत्व स्पष्ट करते. गुरुच्या सोबत जेव्हा आपण असतो तेव्हा त्या वातवरणात गंगजलासारखी पवित्रता असते. सकारात्मक दृष्टिकोण आणि उचित विचार तसेच गुरुकड़े असणाऱ्या अगाध ज्ञानामुळे मानवी मनातील वाईट विचार नकारात्मक दृष्टिकोण ह्याचा हळू हळू नाश होत जातो. गुरु हे एकमेव  असे व्यक्तिमत्व आहे जे सतत त्यांच्या शिष्याना काही ना काही योग्य तेच देत असतो. त्यांच्या शिष्यांपासून अयोग्य ते वंचित राहत.      मानवी शरीरात मन हे सर्वात चंचल असते. जे समोर घडते त्याचा मागोवा घेत असते. एखाद्या गोष्टीचा पाठला...

साईंसत्चरित्र का वाचावे?

Image
साईंचरित्रतात  साईंनचे महात्म्य त्यांचे प्रेम  आणि त्यांच्या भक्तनविषयीं त्यांचा असणारा  जिव्हाळा  आपल्याला वाचायला मिळते.  साईंच्या  रागत पण त्यांच्या बाळाविषयी प्रेमच  असते.ह्यांचे जीवंत उदाहरण म्हणजे साईंसत्चरित्र.  साईंसत्चरित्र म्हणजे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. हा  ग्रंथ नसून आपला दैनंदिन आयुष्य आहे . साईंसत्चरित्र हा एकमेव ग्रंथ असा आहे ज्या द्वारे आपण प्रत्यक्ष साईबाबांसोबत संवाद साधु शकतो.  साईंसत्चरित्र वाचायची इच्छा होने किंवा साईंसत्चरित्र वाचने ही सुद्धा साईंचीच इच्छा असते. जेथें साईचरित्र पठण । तेथें सदैव साईनिवसन । श्रद्धापुर्वक चरित्रावर्तन । करितां तो प्रसन्न सर्वभावें ॥ 220 ॥ अध्याय 35 वा ओवी क्रमांक 220.  साईंसत्चरित्राचे जेथे पठन होते  तिथे सदैव साईचा वास असतो म्हणजेच बाबा स्वतः तेथे हजर असतातच. साईंचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर साईंचरित्र वाचायलाच हव. 

साईंसत्चरित्र ग्रंथ कसा वाचावा?

Image
   साईंसत्चरित्र हा ग्रंथ वाचण्यासाठी तो पुस्तकी रूपातच असावा अस काही नाही.  ऑनलाइन सुद्धा हा ग्रंथ उपलब्ध आहे.  Google playstore मधून आपण आपल्याला हव्या त्या भाषेत हा ग्रंथ डाउनलोड करू शकतो.  साईंसत्चरित्र ह्या ग्रंथातील अध्यायातील  ओवी हळुवार   वाचाव्या . प्रत्येक  शब्दाचा अर्थ जाणून घेऊन योग्य तो संदर्भ जोडायचा.  प्रत्येक  अध्याय तीन ते चार वेळा वाचला गेलाच पाहिजे .  अध्यायातील  आवडलेल्या ओवी एका वहित लिहून ठेवा . आणि त्या  मनातल्या मनात गुनगुनत रहा . अशा प्रकारे अभ्यास केल्यावर तो नीट लक्षात राहतो.  ज्यावेळेस साईंसत्चरित्र आपल्या दैनंदिन जीवनात आपण उतरउ त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्या नवीन जीवनाची सुरवात झालेली असेल.  गुरु आपल्याला ज्ञान देत असतो त्याला आपल्या आयुष्यात कस उतरवायचा हे आपल्यावर अवलंबून आहे.  साईंसत्चरित्र हा ग्रंथ साईंच्या रूपातला गुरु आहे त्याला आपल्या अंगवळणी लाऊ या.                ॐ साईं राम   

साईंसच्चरित्र म्हणजे काय ?

Image
📖 साईंसत्चरित्र म्हणजे आपण स्वतः आपल्या दररोजच्या जीवनात होणाऱ्या घडामोडि म्हणजे साईंसच्चरित्र. साईं आपल्या दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी घडत असतात त्या सर्वात ते आपल्या सोबत कसे असतात ते आपल्याला कसे सहाय्य करतात कसा पाठिंबा देतात ह्याची आपल्याला कल्पनापण नसते. साईंसत्चरित्र म्हणजे नक्की काय तर   आपल्या जीवनातील साईचे अस्तित्व ठळक पद्धतीने जाणवणे. साईचा प्रत्यक्ष अनुभव घेणे.