अध्याय तिसरा सारांश
अध्याय तिसरा अतिशय महत्वाचा आहे हयात बाबांच्या मुखीची काही वाक्ये आणि त्यांची वचने ह्यांचा समावेश आहे. नामस्मरणाचे महत्त्व आणि बाबांच्या जवळ जाण्यासाठी हा अध्याय अतिशय उपयुक्त आहे. नामस्मरणाचे महत्व नाम संकीर्तन साध पै सोपे | जळतील पापे जन्मांतरीचि ||1|| तुकाराम महाराज ह्या अभंगात नामस्मरणाचे महत्व सांगतात. नामस्मरण हे सर्वात सोपे साधन आहे जन्मांतरीचि पापे धुवायला. नामस्मरणाने पापे फक्त धुउन नाही तर जळून जातात म्हणजेच काय तर समूळ नष्ट होतात. नाम नारायण अंती उद्धारक |नामा म्हणे देख भाक माझी || संत नामदेवाच्या अभंगात त्यांनी नामाचे महत्व विशद केले आहे. भगवंताच्या नामानेच उद्धार होणार आहे. त्याचा फक्त अंश देखील माझा उद्धार करणार आहे. संतांनी नामस्मरणाचे महत्व वेळोवेळी मांडलेच आहे. नामस्मरण हे असे बीज आहे जे उजाड जमिनीवरही ओलावा आणून त्यात बी सहज़ पेरले जाईल. त्या" बी " ला अंकुर फुटुन त्याचा सतत फुलनारे रोपटे येते. ह्या रोपट्याला खत पाणी मिळत ते सेवा आणि भक्तीच. नामस्मरणाचे बी पेरणारे आपण...